Taarak Mehta मधील या अभिनेत्रीचा बिकीनी लूक पाहून तुम्ही म्हणाल, "बबिताची जादू आता संपली", पाहा फोटो

डान्सची आवडही तिला 'डान्स इंडिया डान्स'मध्ये घेऊन आली. याशिवाय आराधना शर्मा अनेक डेली सोपचा भागही आहे.

Updated: Oct 26, 2021, 08:03 PM IST
Taarak Mehta मधील या अभिनेत्रीचा बिकीनी लूक पाहून तुम्ही म्हणाल, "बबिताची जादू आता संपली", पाहा फोटो

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा भाग असलेली आराधना शर्मा खऱ्या आयुष्यात खूपच बोल्ड आहे. आजकाल अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे सतत चर्चेत असते. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून आराधनाला वेगळी आणि नवी ओळख मिळाली आहे. आराधना शर्मा सध्या अनेक बोल्ड फोटोशूट करत आहे. तिच्या प्रत्येक फोटोशूटमधून ती तिच्या चाहत्यांना भूरळ पाडत आहे.

आराधना शर्मा खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे. ती तिच्या हावभावाने लोकांची मने जिंकते. आराधनाची शैली सर्वात वेगळी आहे आणि ती 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सोबत जोडलेली सर्वात बोल्ड अभिनेत्री आहे.

आराधना शर्माचे तिच्या इंस्टाग्रामवर खूप चाहते आहेत. आराधना शर्मा तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंसह तिच्या डान्स व्हिडीओंची झलक तिच्या चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर करत असते.

आराधना शर्माला स्प्लिट्सविला-12 मधून ओळख मिळाली. ती एक स्पर्धक म्हणून शोचा भाग बनली. स्प्लिट्सविलामध्ये आराधना तिच्या बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत होती. अभिनेत्री असण्यासोबतच ती एक डान्सर आणि मॉडेल देखील आहे.

आराधना शर्माने तिच्या करिअरची सुरुवात बूगी वूगी डान्स रिऍलिटी शोमधून केली होती. नंतर डान्सची आवडही तिला 'डान्स इंडिया डान्स'मध्ये घेऊन आली. याशिवाय आराधना शर्मा अनेक डेली सोपचा भागही आहे.

आराधना शर्मा 'तारक मेहता का उल्टा चष्मा'पूर्वी 'अलादिन नाम तो सुना होगा' आणि 'हीरो गयाब...'मध्येही दिसली होती.

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये औषधांच्या काळाबाजारावर अनेक एपिसोड दाखवण्यात आले होते. दरम्यान, शोमध्ये आराधना शर्माची एन्ट्री झाली. शोमध्ये ती नेहमी फॉर्मल ड्रेस परिधान करताना दिसायची. तिने यामध्ये लेडी डिटेक्टिव्हची भूमिका साकारली होती.