प्रतिक बब्बरने नावातून वडिलांचं नाव आणि आडनाव हटवलं; भाऊ म्हणाला 'नुसतं नाव बदलून...'

राज बब्बर (Raj Babbar) यांच्या कुटुंबात सर्व काही आलबेल नसल्याचं दिसत आहे. प्रतिक बब्बरने (Prateik Babbar) लग्नात कुटुंबालाच न बोलावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आता त्याने आपल्या नावातून आडनाव काढून टाकलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 25, 2025, 06:51 PM IST
प्रतिक बब्बरने नावातून वडिलांचं नाव आणि आडनाव हटवलं; भाऊ म्हणाला 'नुसतं नाव बदलून...'

राज बब्बर (Raj Babbar) यांच्या कुटुंबात सर्व काही आलबेल नसल्याचं दिसत आहे. प्रतिक बब्बरने (Prateik Babbar) लग्नात आपल्या कुटुंबाना निमंत्रण दिलं नव्हतं. यानंतरच कुटुंबात अंतर्गत वाद असल्याचं समोर आलं होतं. प्रतिकने वडिलांनाच लग्नात न बोलावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आता त्याने आपल्या नावातून वडिलांचं नाव आणि आडनाव काढून टाकलं आहे. प्रतिक बब्बरने नावात वडिलांच्या जागी आईचं नाव आणि आवनाव लावलं आहे. 

प्रतिक बब्बरने नाव बदलल्यानंतर त्याचा सावत्र भाऊ आर्या बब्बरने यावर प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुस्तान टाईम्सशी संवाद साधताना त्याने म्हटलं आहे की, "मला फक्त इतकंच सांगायचं आहे की, स्मिता मा आमच्याही आई आहेत. त्याला कोणतं नाव ठेवायचं नाही आणि कोणतं ठेवायचं आहे ही त्याची निवड आहे". "उद्या मी अचानक उठवून माझं नाव आर्या बब्बरपासून बदलून आर्या किंवा राजेश केलं तरी मी बब्बरच राहणार आहे," असंही त्याने स्पष्टपणे सांगितलं.

आर्या बब्बरने पुढे सांगितलं की, "तुम्ही तुमचं नाव बदलू शकता, पण आपली ओळख नाही. जर माझं अस्तित्वच त्यात असेल तर मी बब्बरच राहणार. तुम्ही तो कसा बदलू शकता?". प्रतिक बब्बरने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आपण नाव का बदललं याचा उलगडा केला होता. 

तो म्हणाला, "मला परिणामांची पर्वा नाही. मला फक्त ते नाव ऐकल्यावर कसे वाटते याची काळजी आहे. मला पूर्पणणे माझ्या आईशी (स्मिता पाटील) जोडलं जायचं आहे,  तिचं नाव आणि तिचा वारसा. जर तुम्हाला माझं म्हणणं समजलं असेल तर मला वाटत नाही की दुसरे कोणतेही नाव त्या वारशाला कलंकित करेल. ते फक्त तिचे नाव आणि तिचा वारसा असायला हवा. मी तेच बनण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या वडिलांसारखे नाही तर माझ्या आईसारखे बनण्याचा प्रयत्न करत आहे."

स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर राज बब्बर यांनी नादिरा बब्बरशी लग्न केलं आणि त्यांना आर्या बब्बर आणि जुही बब्बर ही दोन मुले आहेत. प्रिया बॅनर्जीच्या आधी, प्रतीकचे लग्न सान्या सागरशी झालं होतं. त्यांनी 2019 मध्ये लग्न केले पण 2023 मध्ये विभक्त झाले, प्रतिकने 14 फेब्रुवारी रोजी आई स्मिता पाटील यांच्या घरी प्रियाशी लग्न केलं.