'लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात त्याने माझ्या...', 'आश्रम' फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

Aashram Fame Actress : लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Mar 15, 2025, 01:26 PM IST
'लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात त्याने माझ्या...', 'आश्रम' फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
(Photo Credit : Social Media)

Aashram Fame Actress Aaditi Pohankar : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलची 'आश्रम' सीरिज आणि त्यात काम करणाऱ्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. आता या वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यात पम्मी पहलवानची भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती पोहनकर तर सगळ्यांच्या लक्षात आहे. अदिती पोहनकर आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दादर स्थानकावर महिलांच्या डब्ब्यात घडलेल्या एका घटनेविषयी खुलासा केला आहे. 

अदितीनं ही मुलाखत 'हॉटरफ्लाय'ला दिली होती. अदितीनं या मुलाखतीत तिला लोकलमधून प्रवास करताना आलेल्या एका अनुभवाविषयी सांगितलं. अदिती म्हणाली, 'मी लोकलनं प्रवास करत होते आणि फर्स्ट क्लासच्या डब्यात मी चढले. महिलांच्या फर्स्ट क्लास डब्यात छोट्या शाळकरी मुलांना येण्यास परवानगी आहे. त्यामुळे अनेकदा ही मुलं या डब्याच चढतात. आता ही गोष्ट मी 11 वी मध्ये असतानाची असेल. माझ्याच समोर डब्यात एक मुलगा उभा होता. दादरवरुन जशी ट्रेन निघाली त्याने माझ्या छातीला हात लावला. भर दिवसा 11 वाजता ही घटना झाली.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aaditi S Pohankar (@aaditipohankar)

पुढे याविषयी सविस्तर सांगत अदिती म्हणाली, 'आता असं पण नाही की अशा तशा कपड्यांमध्ये होते. मी तेव्हा कुर्ती घातली होती. तर त्यावेळी समोरच्या मुलाचा असा काही हेतू असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. त्यामुळे त्याच्या या कृतीनं मला धक्काच बसला. मी पुढच्या स्टेशनला उतरले आणि पोलिस स्टेशनला गेले. आता तिथे गेल्यावर पोलिसांची प्रतिक्रिया शॉकिंग, ते म्हणाले काही झालं नाही ना तुम्हाला आता कुठे त्याला शोधणार?'

हेही वाचा : लग्नानंतर सोनाक्षी सिन्हानं नवऱ्याशिवाय साजरी केली पहिली होळी; झहीर ट्रोल होताच अभिनेत्री म्हणाली...

पुढे पोलिसांकडे तक्रार करायला गेल्यानंतर त्याविषयी सांगत अदिती पुढे म्हणाली, 'त्याचवेळी पोलिस स्टेशनजवळ तो मुलगा मला परत दिसला, तो दुसऱ्या मुलीसोबत देखील हेच करणार होता. तितक्यात मी त्याला ओळखलं आणि पोलिसांना सांगितलं की हा तोच आहे. त्यावर पोलिस माझ्याकडेच पुरावा मागू लागले. मी म्हटलं पुरावा कशाला हवा आहे? त्यानं माझ्यासोबत काय केलं हे मला माहित असणारच ना. त्यानंतर एक महिला पोलिस कॉन्स्टेबल माझ्यासोबत आली. तिनं लगेच त्या मुलाला जाब विचारला, तर त्या मुलानं आपण असं काही केलंच नाही असं म्हणत संपूर्ण घटनेला नकार दिला. रागात मी लगेच त्याच्यावर जोरात ओरडले माझा आवाज ऐकून तो घाबरला आणि लगेच हो, हो, मी केलं असं म्हणाला. त्यानंतर मी त्याची कॉलर पकडली आणि त्याला परत कोणासोबत करशील असा सवाल केला आणि पोलिसांकडे त्याला दिलं. महत्त्वाचं म्हणजे जर मी त्याच्यावर ओरडले नसते तर त्यानं हे मान्यचं केलं नसतं.'