Aastad Kale and Swapnali Patil : कलाकारांची जोरात चर्चा रंगलेली असते याचे एक कारणं असते ते म्हणजे त्यांचे वैयक्तिक आयुष्य. कलाकारांची चर्चा ही सर्वात जास्त होते ती म्हणजे त्यांच्या रिलेशनशिप्सवरून. सध्या अशाच एका सेलिब्रेटी कपलची चर्चा आहे. त्यांनी आपल्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. हे कपल आहे ते म्हणजे अभिनेता आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील. त्यांनी सप्टेंबर 2021 साली त्यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांचे अनेक वर्षे अफेअर होते. शेवटी त्यांनी आपल्या प्रेमाची कबूली दिली आणि त्या दोघांनीही लग्नगाठ बांधली. त्यांच्या अफेअरची चर्चाही बरीच गाजली होती. त्यातून ते दोघं अनेक आपलं प्रेमही व्यक्त करताना दिसले आहेत. ते सोशल मीडियावरही आपले रोमॅण्टिक फोटो शेअर करत होते. स्वप्नालीनं आपल्या आणि आस्तादच्या नात्याविषयी खुलासा केला आहे. यावेळी तिनं त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगितला आहे. चला तर पाहुया की हा किस्सा नक्की काय आहे.
पण तुम्हाला माहितीये का की त्या दोघांचे याआधी फारच कडाक्याचे भांडणं झाले होते. परंतु नक्की हा किस्सा काय होता या लेखातून जाणून घेऊया. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत स्वप्नाली म्हणाली आहे की, ''त्या दिवशी आस्ताद माझ्या घरी आला होता. मी त्याच्यासाठी जेवणही बनवलं होतं. आमचं बोलण सुरू होतं. बोलता बोलता आमच्यात वाद सुरू झाले आणि मी रागाने घर सोडून गेले. रात्रीचे 1 वाजले होते. आस्तादने माझ्या बहिणीला फोन लावला. ती युएसला असते. तिने शाल्मलीला फोन केला. शाल्मलीचा मला फोन आला तिने मला तिच्या घरी बोलवून घेतलं.'' असं ती म्हणाली.
“मला आस्तादचा खूप राग आला होता. मी त्याच्याशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. मी आस्तादच्या वागण्याला कंटाळले होते. त्यावेळी आम्ही लिव्ह इनमध्ये राहत होतो. दुसऱ्या दिवशी मी माझे सगळे कपडे घेऊन निघून गेले. काही दिवसानंतर सगळं निवळलं. आस्तादने माझी माफीही मागितली होती. त्यानंतर आम्ही एकमेकांना अजून एक संधी देण्याचं ठरवलं.” असं ती पुढे म्हणाली.
आस्ताद आणि स्वप्नालीची भेट ही 'पुढचं पाऊल' या मराठी मालिकेतून झाली होती. ही मालिका त्यावेळी प्रचंड गाजली होती. त्यानंतर ते एकमेकांना डेट करू लागले होते. त्या दोघांचीही लव्हस्टोरी जगजाहीर झाली होती. सोबतच बिग बॉसमध्ये त्यानं आपल्या या नात्याची कबूलीही दिली होती. परंतु स्वप्नालीच्या आधी अभिनेत्री प्राची माटे हिच्या तो अखंड प्रेमात होता. 'अग्निहोत्र' या मालिकेदरम्यान त्या दोघांची भेट झाली होती. परंतु प्राची माटेचं निधन झाल्यानं त्यांची प्रेम कहाणी ही अधुरीचं राहिली.
|
CRO
(20 ov) 90/7
|
VS |
ESP
93/2(11.1 ov)
|
| Spain beat Croatia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ESP
(20 ov) 290/3
|
VS |
CRO
75/8(20 ov)
|
| Spain beat Croatia by 215 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
CRO
(18.2 ov) 55
|
VS |
ESP
58/1(4.4 ov)
|
| Spain beat Croatia by 9 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.