'ऐश्वर्याला एक शब्द कळला नाही,' घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनने केला खुलासा, 'मी तिला इतकं...'

अभिषेक बच्चन पहिल्यांदा ऐश्वर्या रायला स्वित्झर्लंडमध्ये भेटला होता. त्यावेळी ऐश्वर्या राय बॉबी देओलसोबत चित्रपटाचं शुटिंग करत होती. त्या पहिल्या डिनरमध्ये त्याने जे काही सांगितले ते तिला समजलं नाही असा खुलासा अभिषेकने केला आहे.  

शिवराज यादव | Updated: Jul 5, 2025, 04:58 PM IST
'ऐश्वर्याला एक शब्द कळला नाही,' घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनने केला खुलासा, 'मी तिला इतकं...'

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची पहिली भेट 2000 मध्ये 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती असा एक गैरसमज आहे. खरंतर त्यांची पहिली भेट अभिषेक बच्चन अभिनेता बनण्याच्या खूप आधी झाली होती. जवळजवळ अर्धा दशकआधी ऐश्वर्या आणि अभिषेक एकमेकांना भेटले होते. 1995 च्या सुमारास त्यांची पहिली भेट झाली तेव्हा ते कोणत्याही चित्रपटाच्या सेटवर नव्हते. स्वित्झर्लंडमध्ये दोघे एकमेकांना भेटले होते. अभिषेक त्याचे वडील अमिताभ बच्चन यांच्या 'मृत्युदत्त' या चित्रपटासाठी प्रोडक्शन असिस्टंट म्हणून काम करत होता आणि स्विस आल्प्समध्ये तो पहिल्यांदा तो आपल्या होणाऱ्या पत्नीला भेटला होता.

नयनदीप रक्षित यांच्याशी त्यांच्या युट्यूब चॅनलवर झालेल्या संभाषणात अभिषेकने ऐश्वर्यासह झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. “मी माझ्या वडिलांच्या मृत्युदत्ता चित्रपटाच्या रेकीसाठी स्वित्झर्लंडमध्ये मेहुल कुमार यांच्यासोबत होतो. मी तिथेच वाढलो असल्याने माझ्या आईने मला पाठवलं होतं. मी तिथल्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकलो होतो, त्यामुळे त्यांना वाटलं की कदाचित मी तेथील चांगल्या जागा दाखवू शकतो. बॉबी (देओल) सोबत माझी खूप मैत्री होती, तो 'और प्यार हो गया' या चित्रपटाचं शूटिंग करत होता आणि ज्या दिवशी आम्ही रेकीवर होतो, तेव्हा आम्ही सेटवर भेट घेण्यासाठी पोहोचलो होतो. तो ऐश्वर्यासोबत शूटिंग करत होता. त्यावेळी मी तिला पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिले. म्हणजे, आम्ही तिला मिस वर्ल्ड आणि त्या सर्व काळात आधीच पाहिले होतं”.

त्यानंतर त्यांच्यात एक नकळत भेट झाली, जी त्यांच्या भविष्याचा पाया रचणारी होती. "त्या संध्याकाळी बॉबी म्हणाला, 'तू माझ्या हॉटेलमध्ये का येत नाहीस, आपण एकत्र जेवू?' मी मिकी कॉन्ट्रॅक्टरला चांगला ओळखत होतो. तो तिचा मेकअप करत होता आणि माझ्या आईचा मेकअपही केला होता. त्याने मला लहानपणी पाहिलं होते. म्हणून आम्ही सर्व एकत्र बसलो होतो आणि तेव्हाच मी तिला पहिल्यांदा भेटलो".

आपण डिनरदरम्यान जे काही बोलत होतो त्यातील काहीच ऐश्वर्याला कळत नव्हतं असा खुलासा अभिषेकने केला आहे. "तिने मला नंतर सांगितलं की, तिला मी बोललेला एकही शब्द समजला नाही कारण माझा उच्चार खूप जड होता," अशी आठवण त्याने हसत सांगितलं. 

स्वित्झर्लंडमध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली असली तरी, त्यांची प्रेमकहाणी काही वर्षांनंतर सुरू झाली. अभिषेकने मणिरत्नम यांच्या 'गुरू' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ऐश्वर्याला प्रपोज केले. त्याने तिला चित्रपटात घातलेल्या त्याच अंगठीने प्रपोज केले. जानेवारी 2007 मध्ये त्यांचा साखरपुडा झाला आणि एप्रिलमध्ये त्यांनी लग्न केलं.