Allu Arjun Pushpa 2 : देशभरात 'पुष्पा 2' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ बघायला मिळत आहे. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसांमध्ये 500 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी देखील मोठ्या प्रमाणात थिएटरमध्ये गर्दी झाली होती. 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी 'पुष्पा 2' हा चित्रपट एक आहे. यावेळी झालेल्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनने मृत महिलेच्या कुटुंबाची माफी मागत कुटुंबियांना 25 लाखांची मदत जाहीर केली आहे. 


प्रीमियरच्या वेळी नेमकं काय घडलं? 


दिग्दर्शक सुकुमार यांचा 'पुष्पा 2' हा चित्रपट प्रदर्शित होऊन 3 दिवस झाले आहेत. या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसांमध्ये 500 कोटींची कमाई करून अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी 4 डिसेंबरला हैदराबादमध्ये प्रीमियर शो पार पडला. यावेळी अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी तिथे चेंगराचेंगरी झाली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी अल्लू अर्जुनने त्या महिलेच्या कुटुंबीयांची माफी मागितली आहे. 


जे काय घडलं त्यामुळे माझं मन खूप दु: खी झालं आहे. त्याबद्दल मला खूप खेद वाटतो आहे. मी त्या महिलेच्या कुटुंबियांची माफी मागतो. तुम्हाला आश्वासन देतो की, आम्ही त्या कुटुंबाला नेहमीच पाठिंबा देऊ. त्यासोबतच 25 लाखांची मदत अल्लू अर्जुनने त्यांना जाहीर केली आहे. त्यांचे नुकसान मी कधीच भरून काढू शकणार नाही. असं अल्लू अर्जुन म्हणाला. 



कांतिशिवा मल्टीफ्लेक्समध्ये दोन गटात राडा


अल्लू अर्जुनचे चाहते मोठ्या प्रमाणात 'पुष्पा 2' चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. अशातच मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील थिएटरमध्ये 'पुष्पा 2' चित्रपटाच्या वेळी गोंधळ उडाला. त्यावेळी थिएटरमध्ये दोन गटात राडा झाला. इतकच नाही तर या वादामध्ये लोकांनी एकमेकांना लाथा-बुक्क्या मारल्या. तर काही लोक या राड्यामध्ये  तुडवले देखील गेले. थिएटरमधील हा राडा खूप वेळ चालू होता. त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि प्रेक्षकांनी हा राडा थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळाने हा राडा थांबला. त्यानंतर काही लोक तेथून निघून गेले.