)
Arshad Warsi : राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शन केलेला ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि कल्ट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन तब्बल 25 वर्षे उलटली असली तरी आजही प्रेक्षक या चित्रपटावर तितकंच प्रेम करत आहेत.
या चित्रपटातील संजय दत्त आणि अरशद वारसी यांची जोडी लोकांच्या मनात घर करून बसली आहे. आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘मुन्नाभाई 3’ लवकरच येऊ शकतो असा मोठा इशारा अरशद वारसीने दिला आहे.
‘इंडियन एक्सप्रेस’शी खास गप्पा मारताना अरशद वारसीने संजय दत्तसोबतच्या कामाचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, 'संजू भन्नाट अभिनेता आहे. त्याच्याकडे एक वेगळंच टॅलेंट आहे. सेटवर त्याच्यासोबत वेळ घालवणं नेहमीच मजेशीर असतं.' अरशद पुढे म्हणाला की, 'मला स्क्रिप्ट लक्षात ठेवण्यात थोडी अडचण होते. पण संजूमुळे मला सगळं आठवून ठेवावं लागायचं. कारण तो रोज सेटवर येऊन विचारायचा ‘भाई, आज कोणता सीन करतोय?’ मग मी त्याला समजवायचो की काल आपण हा सीन केला आणि आज हा सीन आहे.'
राजकुमार हिरानी पुन्हा ‘मुन्नाभाई’वर काम करत आहेत. ‘मुन्नाभाई 3’बाबत विचारले असता अरशद वारसी म्हणाला, 'आधी हा चित्रपट बनणार नाही असं वाटत होतं, पण आता राजकुमार हिरानी खरंच या प्रोजेक्टवर काम करत आहेत. ते त्यावर खूप मेहनत घेत आहेत.
अरशदने सांगितलं की, 'मला वाटतं आता तरी हा चित्रपट बनलाच पाहिजे. हिरानी सरांनी गेल्या वर्षी सांगितलं होतं की त्यांच्याकडे या सिक्वेलसाठी एक भन्नाट आयडिया आहे आणि आता त्या कल्पनेवर प्रत्यक्ष काम सुरू आहे.'
‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा राजकुमार हिरानींचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. त्यानंतर ‘लगे रहो मुन्नाभाई’ रिलीज झाला आणि या सिक्वेलनेही प्रचंड यश मिळवलं.
या दोन्ही चित्रपटांमुळे संजय दत्त – अरशद वारसी ही जोडी आजही लोकांच्या मनात ताजी आहे. त्यामुळेच ‘मुन्नाभाई 3’ची घोषणा होताच सोशल मीडियावर चाहत्यांचा जल्लोष होणार यात शंका नाही.
FAQ
‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन किती वर्षे झाली आणि त्याचं यश काय होतं?
‘मुन्नाभाई एमबीबीएस’ ला प्रदर्शित होऊन २५ वर्षे झाली आहेत. राजकुमार हिरानींचा हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. संजय दत्त आणि अरशद वारसी यांची जोडी कल्ट स्टेटस मिळवली.
अरशद वारसीने ‘मुन्नाभाई 3’ बाबत काय इशारा दिला?
अरशद वारसीने ‘इंडियन एक्सप्रेस’ सोबतच्या मुलाखतीत सांगितलं की, आधी हा चित्रपट बनणार नाही असं वाटत होतं, पण राजकुमार हिरानी आता या प्रोजेक्टवर खरंच काम करत आहेत. ते गेल्या वर्षी एक भन्नाट आयडिया सांगितली होती आणि आता प्रत्यक्ष काम सुरू आहे.
अरशद वारसीने संजय दत्तबद्दल काय अनुभव सांगितला?
अरशद म्हणाले, ‘संजू भन्नाट अभिनेता आहे, त्याच्याकडे वेगळं टॅलेंट आहे. सेटवर त्याच्यासोबत वेळ घालवणं मजेशीर असतं.’ संजयला स्क्रिप्ट आठवत नसे, म्हणून अरशदला सगळं आठवून ठेवावं लागायचं आणि रोज सेटवर संजय विचारायचा, ‘भाई, आज कोणता सीन?’