भाईजान बनला चाचा, अरबाजच्या दुसऱ्या बायकोने दिला पहिल्या मुलीला जन्म

Arbaaz Khan Sshura Khan Welcome Baby Girl: बॉलिवूड अभिनेता अरबाज खानच्या दुसऱ्या पत्नीने दिला मुलीला जन्म. 58 व्या वर्षी अरबाज झाला दुसऱ्यांदा बाप.   

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 5, 2025, 04:01 PM IST
भाईजान बनला चाचा, अरबाजच्या दुसऱ्या बायकोने दिला पहिल्या मुलीला जन्म

Arbaaz Khan Sshura Khan Welcome Baby Girl: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा लहान भाऊ अरबाज खान पुन्हा एकदा बाप झाला आहे. त्याच्या दुसऱ्या पत्नीने शूरा खानने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात आपल्या पहिल्या मुलीला जन्म दिला आहे. शूरा खान शनिवारी सकाळी डिलीवरीसाठी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल झाली होती आणि आता खान कुटुंबात नवीन छोट्या सदस्याचे आगमन झाले आहे.

Add Zee News as a Preferred Source

रविवारी सकाळी अरबाज खानचा रुग्णालयातून आलेला व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की अरबाज रात्री उशिरा आपल्या पत्नी शूराला भेटण्यासाठी रुग्णालयात आला होता. यावेळी त्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता. अरबाज खान आणि शूरा खान यांनी वर्ष 2023 मध्ये विवाह केला होता. अरबाज खानची हे दुसरे लग्न असून, लग्नाच्या दोन वर्षांनंतर शूरा खानने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे खान कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. अशातच शूरा खानची आईही रात्री उशिरा आपल्या मुलीला भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचली होती.

अरबाजचा पहिला मुलगा बहिणीला भेटण्यासाठी रुग्णालयात

अरबाज खानचा पहिला मुलगा अरहान खान आपल्या लहान बहिणीला भेटण्यासाठी रुग्णालयात आला होता. अरहानच्या चेहऱ्यावर मोठा भाऊ झाल्याचा आनंद स्पष्टपणे दिसत होता. याशिवाय अरबाज खानचा धाकटा भाऊ सोहेल खानही रुग्णालयात दिसला. जो बाळाला भेटण्यासाठी आला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अरबाज खान 58 वर्षांच्या वयात दुसऱ्यांदा बाप झाला आहे. यापूर्वी त्याने अभिनेत्री मलायका अरोराकडून अरहान खान या मुलाला जन्म दिला होता. मलायका अरोरा पासून वेगळे झाल्यानंतर अनेक वर्षांनी अरबाज खानने शूरा खानशी लग्न केले. अरबाज आणि शूरा यांच्यात घट्ट नातं असून दोघांना अनेकदा एकत्र कार्यक्रमांमध्ये आनंदात पाहिलं जातं. बाळाच्या आगमनाने खान कुटुंबात आनंदाची लाट पसरली आहे.

2017 मध्ये मलाइकासोबत घटस्फोट

अरबाज खानने याआधी 1998 साली अभिनेत्री मलाइका अरोरासोबत लग्न केले होते. त्यांना अरहान खान नावाचा एक मुलगा आहे. मात्र, अरबाज आणि मलाइका अरोरा यांनी 19 वर्षांच्या लग्नानंतर 2017 मध्ये घटस्फोट घेतला. नंतर मलाइका अरोरा अभिनेता अर्जुन कपूरच्या संपर्कात राहिली. मात्र, 2024 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला.

अशातच आता अभिनेता अरबाज खान आणि शूरा खान हे लवकरच पालक होणार आहेत. त्यांचे मुलं हे घरात सुख-समृद्धी आणणार आहे. चाहते आणि त्याचे कुटुंबातील लोक या आनंददायी क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

FAQ

शूरा खानने मुलीला जन्म कधी दिला?

शूरा खानने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात आपल्या पहिल्या मुलीला जन्म दिला. ती ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी दाखल झाली होती आणि रविवारी जन्म झाला.

अरबाज खान रुग्णालयात कधी दिसला?

रविवारी सकाळी अरबाज खान रुग्णालयातून बाहेर पडताना दिसला. रात्री उशिरा तो शूराला भेटण्यासाठी आला होता, आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

अरबाज आणि शूरा यांचे लग्न कधी झाले?

अरबाज खान आणि शूरा खान यांचे लग्न डिसेंबर २०२३ मध्ये झाले. हे अरबाजचे दुसरे लग्न असून, लग्नानंतर दोन वर्षांत पहिले बाळ झाले.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More