पुढच्या IPL साठी तयार राहा! टायगर श्रॉफने दाखवला जबरदस्त खेळ, चौकार -षटकार पाहून सर्वच थक्क

Tiger Shroff : टायगर श्रॉफने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून यात तो क्रिकेट खेळताना दिसतोय. व्हिडीओमध्ये टायगर श्रॉफ हा बॅटिंग करताना दिसत असून त्याच्या सोबत कोरियोग्राफर गणेश आचार्य सुद्धा दिसतोय. 

पुजा पवार | Updated: Jun 9, 2025, 07:51 PM IST
पुढच्या IPL साठी तयार राहा! टायगर श्रॉफने दाखवला जबरदस्त खेळ, चौकार -षटकार पाहून सर्वच थक्क
(Photo Credit : Social Media)

Tiger Shroff :  बॉलिवूडचा स्टार अभिनेता टायगर श्रॉफ हा बऱ्याचदा सोशल मीडियावर वर्कआउट करताना, फुटबॉल खेळताना व्हिडीओ शेअर करतो. आता टायगर श्रॉफने (Tiger Shroff) सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून यात तो क्रिकेट खेळताना दिसतोय. व्हिडीओमध्ये टायगर श्रॉफ हा बॅटिंग करताना दिसत असून त्याच्या सोबत कोरियोग्राफर गणेश आचार्य सुद्धा दिसतोय. 

टायगर श्रॉफने स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडीओ फॅन्स सोबत शेअर केला आहे. ज्यात टायगर फलंदाजी करून चौकार षटकारांची अतिशबाजी करताना दिसतोय. तर व्हिडीओमध्ये एका ठिकाणी अक्षय कुमार सुद्धा बॅट घेऊन उभा असल्याचं दिसतंय. टायगरची बॅटिंग स्किल पाहून त्याचे फॅन्स थक्क झाले. फिटनेससाठी प्रसिद्ध असणारा टायगर श्रॉफ या व्हिडीओमध्ये त्याची बॉडी देखील दाखवतोय. 

हेही वाचा : वामिका - अकायची काळजी घेणाऱ्याला मिळतो CEO पेक्षा जास्त पगार, किती सॅलरी देतात विराट अनुष्का?

टायगरने शेअर केलेल्या व्हिडीओवर त्याचा फॅन्सनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. 'कोणतीही टेक्निक नाही, पण खूप मस्त खेळतोय'. एकाने लिहिलं की, 'सुपर ब्रो तू तर क्रिकेटपण खेळतोस', अजून एका फॅनने कमेंट करत लिहिले की, 'एनर्जेटिक टायगर'. तर एका फॅन्सने म्हटले की, 'भाई पुढच्या आयपीएलसाठी तयार राहा'.  टायगरच्या एका फॅनने लिहिले की, 'भाई तू क्रिकेटर हो, हे अभिनय वगरे सोडून दे'. 

पाहा व्हिडीओ : 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

tiger shroff

टायगर श्रॉफचा पुढील चित्रपट हा 'बागी 4' असेल, जो यावर्षी 5 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. टायगरचा अ‍ॅक्शन अवतार या चित्रपटात पुन्हा एकदा दिसणार आहे. हर्षाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून यात संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.