Vijay Deverakonda : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाई करून अनेक मोठे विक्रम केले आहेत. या चित्रपटातील औरंगजेब आणि मुघलांबद्दल देशभरात वादविवाद सुरु झाला होता. यामध्ये राजकीय नेते आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आपली मते व्यक्त केली होती. आता या चित्रपटावर एका नवीन दक्षिण अभिनेत्याची प्रतिक्रिया समोर आली आहे. या अभिनेत्याने औरंगजेबला दोन-तीन कानाखाली मारायच्या आहेत असं वक्तव्य केलं आहे.
हा दुसरा-तिसरा कोणी नसून अभिनेता विजय देवरकोंडा आहे. विजयने अलीकडेच हैदराबादमध्ये सूर्याच्या आगामी 'रेट्रो' चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिथे विजयने संभाषणा दरम्यान त्याने एक विधान केले ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला.
'मला औरंगजेबाच्या थोबाडीत मारावंसं वाटतंय'
'छावा' चित्रपट पाहून प्रसिद्ध अभिनेत्याने केलेलं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. अभिनेता विजय देवरकोंडाने छावा चित्रपटात अक्षय खन्नाने साकारलेली औरंगजेबाची भूमिका पाहून संताप व्यक्त केला आहे. याशिवाय औरंगजेबाला मुस्कटात मारण्याची इच्छा देखील विजय देवरकोंडाने व्यक्त केली आहे. छावा चित्रपटात अक्षय खन्ना क्रूर, निर्दयी औरंगजेबाच्या भूमिकेत होता. अभिनेत्याच्या अभिनयाचे कौतुक मोठ्या प्रमाणात झालं. मात्र, त्याला ट्रोल देखील करण्यात आलं. अशातच विजय देवरकोंडाला देखील अक्षय खन्नाने साकारलेली औरंगजेबाची भूमिका पाहून राग व्यक्त केला. ज्यामध्ये त्याने औरंगजेबाच्या मुस्कटात द्यावीशी वाटतेय असं म्हटलं.
विजय देवरकोंडा हा नुकताच 'रेट्रो' चित्रपटाच्या एका कार्यक्रमात पोहोचला होता. त्यावेळी त्याने छावा चित्रपटाबद्दल बोलताना औरंगजेबाची भूमिका पाहून राग आल्याचं म्हटलं. मला औरंगजेबाला भेटून दोन-तीन कानाखाली कशा मारता येतील याची तो संधी शोधत असल्याचं त्याने सांगितलं. तसेच ब्रिटिशांना देखील भेटून कानाखाली मारण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
अभिनेता विजय देवरकोंडा लवकरच 'किंगडम' चित्रपटात दिसणार आहे. जो एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचे शूटिंग हैदराबाद, विशाखापट्टणम, केरळ आणि श्रीलंका या ठिकाणी झाले आहे. हा चित्रपट 30 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.