Anjali Arora : सोशल मीडिया अभिनेत्री अंजली अरोरा आणि वाद यांचं नातं जणू कायमचं झालं आहे. ‘कच्चा बदाम’ या गाण्यामुळे अंजली अरोराला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. या गाण्याने तिला रातोरात स्टार बनवलं आणि ती कंगना रनौतच्या ‘लॉकअप’ या रिअॅलिटी शोमध्ये मुनव्वर फारुकीसोबत स्पर्धक म्हणून दिसली होती.
नेहमीच वादग्रस्त विधानं आणि बोल्ड व्हिडिओंमुळे चर्चेत राहणारी अंजली आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या चर्चेत येण्याचं कारण म्हणजे माता सीतेचा लूक. तिचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्यावरून नेटकरी संतापले आहेत.
अंजली अरोरा लवकरच ‘श्री रामायण कथा’ या चित्रपटात माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता रजनीश दुग्गल, शील वर्मा, निर्भय वाधवा आणि देव शर्मा हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
अंजलीचा या चित्रपटातील एक लुक इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या फोटोत ती केशरी रंगाच्या साडीत दिसत आहे. कंपाळी सिंदूर आणि पल्लू घेत सिंपल लुकमध्ये दिसत आहे. सोबतच तिने सोन्याचे दागिने, हातात बांगड्या आणि लाल बिंदी लावलेली आहे. तिच्या या लुकवरून काहींनी कौतुक केलं आहे तर अनेकांनी तिच्या या लुकवर संताप व्यक्त केला आहे.
अंजलीच्या बोल्ड फोटोमुळे लोकांना तिचं माता सीतेचं पात्र साकारणं पटलेलं नाही. एका चाहत्याने लिहिलं, 'हिला सीता बनवणं म्हणजे मोठा अपमान आहे.' तर दुसऱ्याने म्हटलं की, 'सीतेचं पात्र इन्स्टाग्रामवर ठुमके लावणारी मुलगी निभावू शकत नाही.' तर आणखी एका चाहत्याने म्हटलं, घोर कलियुग आलं आहे. आम्ही हे अजिबात सहन करणार नाही.
‘कच्चा बदाम’ या गाण्याने प्रसिद्ध झाल्यानंतर अंजलीने सोशल मीडियावर स्वतःची ओळख निर्माण केली. तिचा शेवटचा म्युझिक व्हिडिओ ‘दिल पर चलाई छुरियां’ हिट ठरला होता. सध्या ती अभिनय क्षेत्रात आपलं नशिब आजमावत आहे. तथापि, तिच्या वादग्रस्त व्हिडिओंमुळे आणि एका कथित MMS लीकमुळे ती आधीही चर्चेत आली होती. सध्या मात्र ‘माता सीतेच्या लुक’मुळे अंजलीवर टीकेचा भडिमार होत आहे आणि अनेक चाहत्यांनी तिच्यावर धार्मिक भावनांचा अनादर केल्याचा आरोप केला आहे.
FAQ
अंजली अरोरा कोण आहे आणि तिची प्रसिद्धी कशी झाली?
अंजली अरोरा ही एक सोशल मीडिया सेलिब्रिटी आणि अभिनेत्री आहे. तिला २०२२ मध्ये 'कच्चा बदाम' या व्हायरल गाण्यामुळे रातोरात प्रसिद्धी मिळाली. या गाण्याने तिला स्टार बनवलं आणि ती ऑल्ट बालाजीच्या 'लॉकअप' रिअॅलिटी शोमध्ये मुनव्वर फारुकीसोबत स्पर्धक म्हणून दिसली. तिचे बोल्ड व्हिडिओ आणि वादग्रस्त विधानांमुळे ती नेहमीच चर्चेत राहते.
'श्री रामायण कथा' चित्रपटाबद्दल काय माहिती?
हा एक आगामी चित्रपट आहे ज्यात अंजली अरोरा माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात अभिनेता रजनीश दुग्गल (श्री राम), शील वर्मा, निर्भय वाधवा आणि देव शर्मा हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट रामायणाच्या कथेवर आधारित आहे आणि अंजलीचा लुक सोशल
मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
अंजलीच्या माता सीता लुकमुळे वाद का सुरू झाला?
अंजलीचा केशरी साडी, सिंदूर, लाल बिंदी आणि सोन्याचे दागिने घातलेला लुक इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला. काहींनी याचे कौतुक केले, पण बहुसंख्य नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. त्यांचा युक्तिवाद असा आहे की, तिचे बोल्ड आणि व्हायरल व्हिडिओ (जसे 'कच्चा बदाम' आणि 'दिल पर चलाई छुरियां') लक्षात घेता, ती माता सीतेचे पवित्र पात्र साकारण्यास योग्य नाही. यामुळे धार्मिक भावनांचा अनादर होत असल्याचा आरोप होत आहे.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(49.5 ov) 271
|
VS |
USA
273/6(49 ov)
|
| USA beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.