)
Actress's Boyfriend Cheated on Her With Her Bestfriend : ईरानी-जर्मन अभिनेत्री एलनाज नौरोजी आपल्याला बऱ्याच हिंदी सिनेमांत पाहायला मिळाली आहे. अलीकडेच ती करण जोहरच्या रिअॅलिटी शो ‘द ट्रेटर्स’मध्ये दिसली होती. पण एका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या खासगी आयुष्यात तिला बसलेल्या मोठ्या धक्क्याविषयी सांगितलं.
एलनाजनं 'इन्स्टंट बॉलिवूड'ला नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत एलनाज म्हणाली, 'मी एका व्यक्तीला डेट करत होते. आमचं नातं चार वर्षं टिकलं. पण शेवटी त्याच व्यक्तीनं मला धोका दिला.'
सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे, एलनाजचा बॉयफ्रेंड तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणीसोबत धोका दिला होता. एलनाजनं सांगितलं की मला कळलं की त्या 4 वर्षात तो माझ्या बेस्टफ्रेंडसोबत देखील होता. पुढे एलनाजला विचारण्यात आलं की तिला याविषयी कोणत्याही प्रकारचा संशय झाला नाही?
तेव्हा एलनाज म्हणाली, 'बेस्टफ्रेंडवर कुणाला संशय येतो का?' त्यानंतर पुढे तिला विचारण्यात आलं की दोघांनी तिनं कसं पकडलं? तर उत्तर देत एलनाजनं सांगितलं की जसं तुम्ही ‘ट्रेटर्स’मध्ये पाहिलं, तसंच माझ्या खासगी आयुष्यातही मला काही संकेत मिळाले होते. जेव्हा आपण शंका घेतो, तेव्हा आपण खोलवर जातो.'
एलनाजनं पुढे सांगितलं की मी मेसेजेस, ई मेल्स आणि फोटोजच्या मदतीनं हे सिद्ध केलं की दोघांनी तिची फसवणूक केली आहे. त्यानंतर तिला कळलं की आयुष्यात झालेली सगळ्यात मोठी फसवणूक ही तिची बेस्टफ्रेंड आणि बॉयफ्रेंडनं केली आहे.
करण जोहरच्या रिअॅलिटी शो 'द ट्रेटर्स' मध्ये एलनाज नौरोजीचा गेम आणि तिच्या स्मार्टनेस प्रेक्षकांना प्रचंड आवडला. तिला प्रेक्षकांनी ‘मास्टरमाइंड’ असंही म्हटलं. मात्र, एलनाज आता शोमधून बाहेर आली आहे. तरी तिचा गेमप्ले प्रेक्षकांच्या लक्षात राहिलं आहे.
एलनाज नौरोजीच्या इन्स्टाग्रामवर तब्बल 3.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. इतकंच नाही तर चाहत्यांमध्ये ती नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.