मुलासोबत अभिनेत्रीने शेअर केला न्यूड फोटो, 90 दिवसांची कारागृहाची शिक्षा

जजने सुनावली ही शिक्षा 

Updated: Apr 22, 2021, 05:18 PM IST
मुलासोबत अभिनेत्रीने शेअर केला न्यूड फोटो, 90 दिवसांची कारागृहाची शिक्षा

मुंबई : घानाची अभिनेत्री रोजमोंड ब्राऊनने गेल्यावर्षी आपल्या सात वर्षांच्या मुलासोबत एक फोटो पोस्ट केला. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणं या अभिनेत्रीला खूप महागात पडलं. यामुळे अभिनेत्रीला तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आता तिला आक्राच्या न्यायालयाने जामीन दिला आहे. 

जून 2020 मध्ये अभिनेत्रीने मुलाच्या वाढदिवसादिवशी हात पकडून स्क्वॉट्स केलं होतं. याचा फोटो तिने पोस्ट केला होता. या फोटोत तिने आपलं शरीर केसांनी लपवलं होतं आणि मुलाने देखील फक्त अंडरवेअर घातलं होतं. या फोटोनंतर घानात खूप खळबळ उडाली होती. लोकांनी अभिनेत्री आणि मुलाच्या फोटोवर खूप प्रश्न विचारले होते. ज्यानंतर पोलो म्हणजे अभिनेत्रीने फोटो डिलीट केला आणि माफी देखील मागितली. 

जजने सांगितली ही गोष्ट 

जज क्रिस्टियाना कॅनने प्रश्न विचारला की,'तिने हे करण्यापूर्वी मुलाची परवानगी घेतली होती का?' तिने मुलांच्या हक्कांचं पालन केलं का? त्यांनी हे केलं नाही त्यांनी शिक्षा सुनावण्यात यावी. मालूम ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव आहे. ती अनेकदा आपल्या मुलासोबत फोटो शेअर करत असते. 2019 मध्ये ती रॅपर कार्डी बीला भेटली होती. तिचे फोटो पोस्ट करत असते.