'या' अभिनेत्रीच्या बाथरूममधून जप्त केले होते लाखो रुपये, कोर्टात दिली वेश्याव्यवसाय केल्याची कबुली

बरंच नाव आणि पैसे कमावलेल्या अभिनेत्री माला सिन्हा यांना खूप कंजूस असल्याचं म्हटलं जातं

Updated: May 5, 2021, 04:09 PM IST
'या' अभिनेत्रीच्या बाथरूममधून जप्त केले होते लाखो रुपये, कोर्टात दिली वेश्याव्यवसाय केल्याची कबुली

मुंबई : 80च्या दशकातील बऱ्याच अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी बॉलिवूडवर राज्य केलं आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज आपण बोलत आहोत माला सिन्हा या अभिनेत्रीबद्दल, ज्यांनी 40 वर्षांपासून सिनेमांवर राज्य केलं. माला सिन्हा यांना चाहत्यांची कसलीही कमी नव्हती, त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्या अभिनय आणि गायनाव लोक फिदा होते. मग असं काहीतरी घडलं ज्यामुळे केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर माला यांच्या चाहत्यांनाही आश्चर्य वाटले. माला सिन्हा यांच्या घराच्या बाथरूममध्ये कोट्यवधी रुपये सापडले आणि हे ऐकून लोक दंग झाले.

लहानपणी माला सिन्हा यांचं नाव अल्दा सिन्हा होतं, मात्र त्यांच्या शाळेतील मुलं त्यांना दालदा म्हणवून चिडवत असत. ज्यानंतर त्यांनी आपलं नाव बदलून माला सिन्हा असं ठेवलं. माला सिन्हा यांनी आपला चित्रपट प्रवास बंगाली चित्रपटांमधून सुरू केला. माला चित्रपटात येण्यापूर्वी रेडिओवर गायच्या. बंगाली चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर माला यांना फारशी ओळख मिळाली नाही. त्यानंतर त्या मुंबईत आल्या

स्वप्नांच्या शहराने माला सिन्हाला ओळख दिली. एक दिवशी माला सिन्हा अचानक गुरु दत्त यांना भेटल्या. माला सिन्हा यांचं सौंदर्य पाहून गुरुदत्त यांनी त्यांना चित्रपटात घेण्याचं मनाशी केलं आणि मग माला 1957 मध्ये आलेला सिनेमा 'प्यासा' मध्ये त्या झळकल्या.  या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता गुरुदत्त होते. हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो हिट ठरला. माला यांना 'प्यासा' या चित्रपटापासून ओळख मिळाली.

यानंतर मालाला सिन्हा यांना ऑफरवर ऑफर मिळू लागल्या.  त्यानंतर त्यांनी ''हैमलेट', 'बादशाह', 'रियासत', 'एकादशी', 'रत्न मंजरी', 'झांसी की रानी', 'पैसा ही पैसा' और 'एक शोला'मध्ये भूमिका साकारल्या. माला सिन्हा आता प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होत्या.

बरंच नाव आणि पैसे कमावलेल्या अभिनेत्री माला सिन्हा खूप कंजूस असल्याचं म्हटलं जातं. इतकेच नव्हे तर सिनेमॅटोग्राफीच्या कॉरिडॉरमध्ये असंही वृत्त आलं होतं की, माला सिन्हा नोकरांवरील खर्च वाचवण्यासाठी स्वत: च्या घरातली सगळी कामे स्वत: करत असत. एकदा मुंबईतील माला सिन्हा यांच्या घरावर आयकरांवर छापा टाकण्यात आला. यावेळी त्याच्या बाथरूमच्या भिंतीवरून 12 लाख रुपये जप्त करण्यात आले. त्या दिवसांत, इतके रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम

इनकम टॅक्सचे अधिकारी हे पैसे जप्त करण्याबद्दल बोलत होते, ते म्हणाले ''हे पैसे वाचवण्यासाठी अभिनेत्री माला सिन्हा यांनी कोर्टात एक अत्यंत धक्कादायक विधान केलं ज्यामुळे तेथे उपस्थित सर्व लोक चकित झाले. हे पैसे वाचवण्यासाठी माला सिन्हा यांनी असं सांगितलं होत की, त्यांनी हे पैसे वेश्याव्यवसाय करून मिळवले आहेत.

असं म्हणतात की, माला सिन्हा यांचे वडील अल्बर्ट यांना हे पैसे जाऊ द्यायचे न्हवते, म्हणून त्यांनी वकिलाचा हा सल्ला स्वीकारला आणि मला सिन्हा यांनी हे निवेदन दिलं. यानंतर, लोक माला सिन्हाला चुकीच्या नजरेने पाहू लागले. त्यानंतर १९६६ मध्ये माला सिन्हा यांनी चिदंबरम प्रसाद लोहानी या नेपाळी अभिनेत्याशी लग्न केलं.

माला आणि चिदंबर यांना प्रतिभा सिन्हा नावाची एक मुलगी होती. प्रतिभा सिन्हानेही आईसारखंच सिनेसृष्टीत प्रवेश केला होता, पण तिचं करिअर फारसं झालं नाही. आणि ती फ्लॉप झाली. प्रतिभा सिन्हा अखेर 2000 मध्ये आलेल्या फिल्म 'चले अपने संग' या चित्रपटात दिसली होती. तर अभिनेत्री माला सिन्हा अखेर 1994साली 'जिद' या चित्रपटात दिसल्या होत्या. असं म्हणतात की अभिनेत्री माला सिन्हा आपल्या मुलीच्या अपयशामुळे खूप निराश झाल्या होत्या आणि म्हणून ती कायमच्या लाईमलाइट

पासून दूर गेली. आता ती आपल्या मुलीसह मुंबईत  राहत आहे. माला सिन्हा यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. ज्यामध्ये 'अपने हुए पराए', 'फूल बने अंगारे', 'कर्मयोगी', 'धूल का फूल', 'आसरा', 'दो कलियां', 'आंखें', 'दिल तेरा दीवाना', 'हरियाली और रास्ता', 'हिमालय की गोद में', 'दिल तुझको दिया', 'नसीब', 'नया जमाना', 'लाल बत्ती', 'गुमराह', 'अनपढ़' 'सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.