Kangana Ranaut : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या संसदीय कर्तव्यांमध्ये आणि तिच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्री कंगना रणौत ही नुकतीच हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील एका राजकीय कार्यक्रमासाठी पोहोचली होती. यावेळी कंगना रणौतने कार्यक्रमात बोलताना तिच्या मनालीमधील घराच्या वीज बिलाबद्दल धक्कादायक माहिती शेअर केली. तिच्या मनाली येथील घराचे वीज बिल 1 लाख रुपये आले आहे. जरी ती तिथे राहत नसली तरी.
कंगना रणौतचे मनालीमधील घर रिकामे आहे. तरी देखील तिला 1 लाख रुपये बिल आले आहे. मंडी येथील एका कार्यक्रमात अभिनेत्री कंगनाने वीज विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केला आहे. हिमाचल प्रदेशची स्थिती चिंताजनक असल्याचे देखील तिने सांगितले. कंगनाचे हे विधान सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक कंगनाला वीज विभागाकडे तक्रार करण्याचा सल्ला देत आहेत.
कंगना रणौतच्या मनालीमधील घराचे वीज बिल 1 लाख रुपये
कंगना रणौतने हिमाचल प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली. या महिन्यात मला माझ्या मनाली येथील घराचे 1 लाख रुपये वीज बिल आलं आहे. जिथे मी राहतही नाही. सध्या हिमाचल प्रदेशची परिस्थिती खूप वाईट आहे. आम्ही जे वाचतो आणि जे घडत आहे त्याची आम्हाला लाज वाटते आहे. पण आपल्याकडे एक संधी आहे. तुम्ही सर्वजण माझे भाऊ आणि बहिणी आहात. तुम्ही सर्वजण जमिनीवर खूप मेहनत करता ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण या देशाला आणि राज्याला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जावे. कंगना म्हणाली की, हे लोक लांडगे आहेत. आपल्या राज्याला त्यांच्या तावडीतून मुक्त करावे लागेल असं तिने सांगितले.
अभिनेत्री कंगना रणौतचा शेवटचा चित्रपट 'इमर्जन्सी' होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आता चाहते तिच्या आगामी चित्रपटाची वाट पाहत आहेत. ज्यामध्ये ती लवकरच आर.माधवनसोबत काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात कंगना रणौत पुन्हा एकदा तनुच्या भूमिकेत दिसणार आहे.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.