Bollywood Actress : बॉलिवूडमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. कारण अभिनेत्री कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या घरी नुकताच एका गोंडस मुलाचा जन्म झाला आहे. शुक्रवारी या दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही आनंदाची बातमी शेअर केली आणि पाहता पाहता संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीतून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला.
कतरिनाच्या प्रेग्नेंसीची बातमी समोर आल्यानंतरच चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती. अखेर तो क्षण आला आणि विक्की-कतरिनाच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. दोघांचे चाहते आणि बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी या आनंदात सहभागी झाले आहेत. मात्र, कतरिनाच नव्हे तर या वर्षी इतर अनेक अभिनेत्रीही मातृत्वाचा आनंद साजरा करत आहेत.
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि तिचा पती राघव चड्ढा यांनी 19 ऑक्टोबर रोजी आपल्या बाळाच्या जन्माची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. यावेळी त्यांनी लिहिलं की, 'शेवटी तो आला! आमचा लहान पाहुणा… आमचं आयुष्य आता पूर्ण झालं आहे. आधी आम्ही फक्त एकमेकांसाठी जगत होतो. आता आमचं जग बदलून गेलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
बॉलिवूडची मोहक अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिने यंदा दुसऱ्यांदा मातृत्वाचा आनंद घेतला आहे. तिचा पती मायकेल डोलन यांच्यासोबत तिने मुलाच्या जन्माची बातमी इन्स्टाग्रामवर दिली. त्यांनी आपल्या चिमुकलीचे नाव कीनू राफ़े डोलन ठेवलं आहे. विशेष म्हणजे इलियाना आणि मायकेल यांनी 2023 मध्येच आपल्या पहिल्या मुलाचं कोआ फिनिक्स डोलनचं स्वागत केलं होतं.
अभिनेत्री आणि बिग बॉस फेम सना खान हिने या वर्षी 5 जानेवारी रोजी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. सना आणि तिचा पती मुफ्ती अनस सईद यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव सैयद हसन जमील ठेवलं आहे. सना खानने ऑक्टोबर 2020 मध्ये चित्रपटसृष्टीला अलविदा करत नोव्हेंबरमध्ये इस्लामिक स्कॉलर मुफ्ती अनस सईदशी सूरत येथे विवाह केला होता. 2023 मध्ये तिने पहिल्या मुलाला सईद तारिक जमीलला जन्म दिला होता.
या सर्व अभिनेत्रींसाठी 2025 वर्ष खास ठरत आहे. कतरिना-विक्की, परिणीती-राघव, इलियाना-मायकेल आणि सना- अनस यांच्या कुटुंबात आता आनंदाचे सूर घुमत आहेत.
FAQ
कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांच्या मुलाचा जन्म कधी झाला?
कतरिना आणि विक्की यांनी शुक्रवारी (7 नोव्हेंबर 2025) आपल्या मुलाच्या जन्माची बातमी इन्स्टाग्रामवर शेअर केली.
या दोघांनी ही आनंदाची बातमी कशी दिली?
त्यांनी एक सुंदर पोस्ट शेअर करत लिहिलं – “आमचा छोटा पाहुणा आला आहे, आमचं आयुष्य आता अधिक परिपूर्ण झालं आहे.”
कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल चाहत्यांना कधी माहिती मिळाली होती?
काही महिन्यांपूर्वी कतरिनाच्या बेबी बंपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या प्रेग्नन्सीची चर्चा सुरू झाली होती.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.