Nayanthara Net Worth: बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असणारी नयनताराला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. दमदार अभिनय आणि प्रचंड चाहतावर्ग यामुळे तिची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. शाहरुख खानसोबत ‘जवान’मध्ये काम केल्यानंतर नयनताराची देशभरात ओळख आणखी मजबूत झाली. अभिनयाबरोबरच ती तिच्या लक्झरी लाइफस्टाइलमुळेही सतत चर्चेत असते.
टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, नयनतारा आज सुमारे 200 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. साऊथ इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे.
अभिनेत्री नयनताराकडे चेन्नईमध्ये 100 कोटी किंमतीचा भव्य बंगला आहे. या घरात आधुनिक सुखसुविधा, प्रायव्हेट गार्डन, विशाल हॉल आणि खासगी सुरक्षा व्यवस्था आहे. त्याचबरोबर मुंबईतही तिचं एक सुपर लक्झरी घर आहे. ज्यामध्ये प्रायव्हेट सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, जिम या सर्व सुविधा आहेत.
हैदराबादमध्ये देखील नयनताराचे 30 कोटींचं अपार्टमेंट आहे. तसेच नयनताराकडे सुमारे 50 कोटी रुपयांचे प्रायव्हेट जेट आहे. शूटिंगसाठी वारंवार देशभरात प्रवास करण्यासाठी ती हे जेट वापरते.
नयनताराला लक्झरी कार्सचा मोठा शौक आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये 1.76 कोटींची एक आलिशान कार. 1 कोटी रुपयांची अजून एक कार अशा अनेक गाड्यांचा समावेश आहे.
नयनताराने लिप बाम कंपनीत तब्बल 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ती पती विग्नेश शिवनसोबत Rowdy Pictures नावाची प्रोडक्शन कंपनी चालवते. ज्यांतून अनेक चित्रपट व प्रोजेक्ट्स निर्मिती होतात.
2003 मध्ये मल्याळम चित्रपटातून करिअरला सुरुवात करणाऱ्या नयनताराने तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये दमदार काम केले आहे. लवकरच पुढील चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये मन शंकर वर प्रसाद गारू, टॉक्सिक, Hi, रक्कायी.
नयनताराने 2022 मध्ये दिग्दर्शक विग्नेश शिवन यांच्याशी लग्न केलं. तिच्या लग्नाला शाहरुख खानसह अनेक दिग्गज उपस्थित होते. ऑक्टोबर 2022 मध्ये या दांपत्याने सरोगसीद्वारे दोन जुळ्या मुलांचं स्वागत केलं.
FAQ
1. नयनताराची नेट वर्थ किती आहे?
नयनताराची एकूण संपत्ती अंदाजे 200 कोटी रुपये आहे.
2. नयनतारा साऊथ फिल्म इंडस्ट्रीत किती मानधन घेते?
नयनतारा ही साऊथ इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे फी चित्रपटानुसार बदलते, पण ते खूपच उच्च असते.
3. नयनताराने करिअरची सुरुवात कधी आणि कशी केली?
तिने 2003 मध्ये मल्याळम चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. नंतर ती तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये सुपरहिट ठरली.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.