SSR case : अभिनेत्रीचा संताप, रिया चक्रवर्ती देहव्यापार करणाऱ्यांपेक्षाही.....

सुशांतच्या जीवाला धोका असल्याची माहिती मिळताच.... 

Updated: Aug 6, 2020, 03:22 PM IST
SSR case : अभिनेत्रीचा संताप, रिया चक्रवर्ती देहव्यापार करणाऱ्यांपेक्षाही.....
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येबाबत भाष्य करणाऱ्या अनेक पोस्ट आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात येत आहेत. सेलिब्रिटींपासून ते सुशांतच्या प्रेयसीपर्यंत प्रत्येकजणाच्या वक्तव्यांमुळं या प्रकरणाला दर दिवशी एक नवं वळण मिळत आहे. हे सर्व चित्र पाहता आता एका अभिनेत्रीनं युट्यूब चॅनलच्या मदतीनं सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती आणि मुंबई पोलिसांवर निशाणा साधला आहे. 

सुशांतच्या जीवाला धोका असल्याची माहिती मिळताच, त्याचे कुटुंबीय हे सारं कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीसाठी करत नसून समाजात त्याचं असं वेगळं स्थान आहे किमान याचं भान राखलं गेलं पाहिजे होतं आणि त्या अनुशंगानं या प्रकरणी जबाबदार यंत्रणांनी कारवाई करणं अपेक्षित होतं अशा शब्दांत अभिनेत्री पायल रोहातगीनं नाराजगी व्यक्त केली.

सुशांतच्या कुटुंबानं रितसर तक्रार दाखल न करता चुक केल्याचं म्हणत पायलनं पोलीस यंत्रणांना धारेवर धरलं. यावेळी तिनं सुशांतची प्रेयसी म्हणवणाऱ्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावरही टीका केली. रिया चक्रवर्तीची तुलना तिनं देहव्यावापार करणाऱ्यांशी करत तिला पायलनं धारेवर धरलं. 

रिया पैसे तर घेत होती, जाहीरपणे सुशांतसोबतच्या नात्याचा स्वीकार करत नव्हती असं म्हणत पायलनं रियाबाबतचा मोठा खुलासा केला. सुशांतच्या मानसिक तणावासाठी वापरण्याच येणारी औषधं आणि त्याचा त्याच्यावर होणारा वाईट परिणाम या साऱ्या गोष्टी पायलनं व्हिडिओतून मांडल्या. 

जो व्यक्ती तुझ्यावर अवलंबून आहे, ज्या व्यक्तीचं तुझ्यावर प्रेम आहे, त्या व्यक्तीशी तू असं कसं वागू शकतेस असा थेट सवाल पायलनं रियापुढे मांडत तिला यासाठी कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली. पायलचा हा व्हिडिओ पाहता आता पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी चर्चेत असणाऱ्या नावांनी डोकं वर काढलं आहे.