सोशल मीडियावर अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर केली गुडन्यूज
प्राजक्ताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनीही प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.एक व्हिडिओ पोस्ट शेअर करत प्राजक्ताने ही गुडन्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
मुंबई : अभिनेत्री प्राजक्तामाळी ही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आहे. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर प्राजक्ताने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होते. नुकतीच प्राजक्ताने तिच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज शेअर केली आहे. एक व्हिडिओ पोस्ट शेअर करत प्राजक्ताने ही गुडन्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे. आणि काल शूटींगला सुरूवात झाली… #महाराष्ट्राचीहास्यजत्रा #finally Much needed laughter therapy has begun… १४ ॲागस्ट पासून सोम-गुरू रात्री ९ वाजता. असं कॅप्शन देत प्राजक्ताने महाराष्ट्राचा लाडका शो हास्यजत्रा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. असं सांगितलंय.
प्राजक्ताच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनीही प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहीलंय की, नशीब आता आम्हाला ही सह्याद्रीची लेक रोज पाहायला मिळेल. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय की, खरं सांगा चहा कसा होता...? तर अजून एकाने कमेंट करत म्हटलंय, जबरदस्त News तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय, बररर...मग काय हसू का आता..तूम्ही तर.. चहा आणि फरसाण खाऊन बसलात..फरसाण संपला आहे वाटते... तर अजून एकाने कमेंट करत म्हटलंय, चला आता पुन्हा प्राजु तुला रोज बघता येणार खूप वाट पाहत होतो. अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स चाहत्यांनी प्राजक्ताच्या या पोस्टवर केल्या आहेत. प्राजक्ताचं सुत्रसंचालन पाहायला तिचे चाहतेही खूप उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय.
प्राजक्तासोबतच सई ताम्हणकरनं पण एक व्हिडीओ शेअर करुन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसाद ओक आणि प्राजक्ता माळी हे देखील दिसत आहे. या व्हिडीओला सईनं कॅप्शन दिलं, 'Back to MHJ'
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात समीर चौघुले, प्रियदर्शिनी इंदलकर, नम्रता संभेराव, दत्तू मोरे, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात , विशाखा सुभेदार हे कलाकार आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवून प्रेक्षकांची मनं जिंकतात. या कार्यक्रमाची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. येत्या १४ ऑगस्ट पासून हा कार्यक्रम सोनी मराठीवर रात्री सोम-गुरू रात्री ९ वाजता आपल्याला पाहता येणार आहे.