Priyanka Chopra : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तिच्या नव्या म्युझिकल कमबॅकमुळे चर्चेत आहे. मात्र, यावेळी ती चर्चेत येण्याचं कारण तिचं कौतुक नव्हे तर सोशल मीडियावरील ट्रोलिंग ठरलं आहे. प्रियंकाने अलीकडेच प्रसिद्ध इंग्रजी ख्रिसमस गाणं ‘लास्ट क्रिसमस’ याचं देसी वर्जन गायलं आहे आणि त्यावर सध्या सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
बर्याच वर्षांनंतर प्रियंका चोप्रा पुन्हा गायनाच्या विश्वात परतली आहे. तिने या गाण्याला भारतीय टच देत नव्या रूपात सादर केलं आहे. हे गाणं फिल्ममेकर गुरिंदर चड्ढा यांच्या आगामी चित्रपट ‘क्रिसमस कर्मा’ चा भाग आहे. हा चित्रपट 14 नोव्हेंबर 2025 रोजी यूके, आयर्लंड आणि अमेरिकेत प्रदर्शित होणार आहे.
प्रियंकाचं हे गाणं म्हणजे भारतीय आणि पाश्चात्य संगीताच्या सुरांचं सुंदर मिश्रण आहे. या अल्बममध्ये प्रियंकासोबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये गॅरी बार्लो, बिली पोर्टर, नितीन साहनी, शजने लुईस, पिक्सी लॉट, बॉय जॉर्ज, यांचा समावेश आहे. गाण्याची छोटी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रियंकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेक चाहत्यांनी तिच्या देसी ट्विस्टवर खिल्ली उडवली.
एका चाहत्याने लिहिलं, 'प्रियंकाने गाण्याचा आत्माच मारला.' तर दुसऱ्याने कमेंट केली, 'बहुतेक जबरदस्तीने गावं लागलं असावं!' तर आणखी एका चाहत्याने म्हटलं, ‘दिल मेरा चुराया क्यों’चं वर्जनच चांगलं होतं.' काहींनी तर हे गाणं AI जनरेटेड असल्याचा दावा केला आहे तर काहींनी प्रियंकाच्या लिप-सिंक वर प्रश्न उपस्थित केला आहे.
Last Christmas… deh diya dil
Get in the festive spirit and listen now to Priyanka Chopra Jonas, Nitin Sawhney and Anoushka Shankar’s brand new version of Last Christmas - a reimagined classic with a Desi twist, featured in the upcoming #ChristmasKarma movie and perfect for… pic.twitter.com/v8ZPvsFkh2
— Sony Music Soundtracks (@SonySoundtracks) November 7, 2025
काही चाहत्यांनी मात्र प्रियंकाच्या प्रयत्नाचं कौतुक केलं आणि म्हटलं की ती भारतीय रंग जागतिक पातळीवर पोहोचवते आहे. परंतु, ट्रोल्सच्या मते तिने एका क्लासिक गाण्याची बर्बादी केली आहे.
‘क्रिसमस कर्मा’ हा एक म्युझिकल-ड्रामा चित्रपट असून तो सांस्कृतिक मिश्रण आणि आधुनिक नात्यांवर आधारित आहे. प्रियंका या चित्रपटात एका भारतीय संगीतकाराची भूमिका साकारत आहे. थोडक्यात, प्रियंका चोप्राचा हा संगीतप्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. कुणी तिचं कौतुक करतंय तर कुणी टीका. पण एवढं नक्की की ‘देसी टच’ असलेलं हे गाणं सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आलं आहे.
FAQ
1. प्रियंका चोप्राने कोणतं गाणं गायलं आहे?
प्रियंकाने प्रसिद्ध इंग्रजी ख्रिसमस सॉन्ग ‘Last Christmas’ चं देसी वर्जन गायलं आहे, ज्यात भारतीय आणि पाश्चात्य संगीताचं सुंदर मिश्रण आहे.
2. हे गाणं कोणत्या चित्रपटाचा भाग आहे?
हे गाणं फिल्ममेकर गुरिंदर चड्ढा यांच्या आगामी चित्रपट ‘Christmas Karma’ चा भाग आहे. हा चित्रपट 14 नोव्हेंबर 2025 रोजी यूके, आयर्लंड आणि अमेरिकेत प्रदर्शित होणार आहे.
3. या गाण्यात प्रियंकासोबत कोण-कोण सहभागी आहेत?
या म्युझिक अल्बममध्ये आंतरराष्ट्रीय कलाकार जसे गॅरी बार्लो, बिली पोर्टर, नितीन साहनी, शजने लुईस, पिक्सी लॉट आणि बॉय जॉर्ज सहभागी झाले आहेत.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.