Rashmika Mandanna : साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना अलीकडेच अभिनेता जगपती बाबू यांच्या टॉक शो ‘जयम्मु निश्चयमु रा’ मध्ये दिसली. या शोमध्ये रश्मिकाने केलेल्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. महिलांना दर महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीच्या त्रासाविषयी बोलताना तिने म्हटलं की, 'पुरुषांना आयुष्यात किमान एकदा तरी पीरियड यावा, जेणेकरून त्यांना महिलांना काय सहन करावं लागतं हे कळेल.'
तिच्या या वक्तव्यावर अनेकांनी समर्थन दर्शवलं तर काही नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका देखील केली. काहींनी रश्मिकाला ‘पुरुषांविषयी असंवेदनशील’ असल्याचा आरोप केला. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येताच रश्मिकाने आता स्वतः याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
'मी काहीतरी वेगळं बोलते आणि अर्थ काहीतरी वेगळाच काढला जातो'. एका फॅन पेजने शोमधील तिच्या क्लिपसह पोस्ट शेअर करत तिच्या उद्देशाबाबत सकारात्मक भूमिका मांडली. त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, 'ही पुरुषांवर टीका नाही तर महिलांच्या वेदना आणि भावना समजून घेण्याबाबत आहे.'
त्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना रश्मिकाने लिहिले की, 'याबद्दल मात्र कोणी बोलत नाही... शो किंवा इंटरव्ह्यूला जाणं मला यासाठीच भीतीदायक वाटतं. मी एक बोलते आणि त्याचा पूर्णपणे वेगळाच अर्थ काढला जातो' असं ती म्हणाली.
शोमध्ये रश्मिका म्हणाली की, 'हो, मला असं वाटतं की पुरुषांना आयुष्यात एकदा तरी पीरियड यावा. म्हणजे त्यांना महिलांना होणाऱ्या वेदना, त्रास आणि हार्मोनल बदल समजतील. आपण कितीही सांगितलं तरी पुरुषांना ती भावना समजत नाही. पण जर त्यांना एकदा हा अनुभव आला तर ते या वेदनेचं गांभीर्य समजतील.'
Rashmika's perspective on men having periods :))
Sometimes we only want our pain & emotions to be understood. It was never about comparison or diminishing male responsibilities.. but fragile egos chose to twist it that way pic.twitter.com/tF52o6ct45— Shayla ⋆˙ (@bealive_79) November 11, 2025
“मला इतका भयानक पिरियड पेन होतो की एकदा मी वेदनेमुळे बेशुद्ध पडले. मी अनेक टेस्ट केल्या, डॉक्टरांनाही विचारलं; पण वेदनेचं नेमकं कारण कळलं नाही. प्रत्येक महिन्यात मी देवाला विचारते ‘हे इतकं का होतंय?’ त्यामुळे मला वाटतं की हे फक्त अनुभवानेच समजू शकतं.'
दरम्यान, रश्मिकाचा अलीकडेच रिलीज झालेला तेलुगू रोमँटिक ड्रामा चित्रपट ‘द गर्लफ्रेंड’ ला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे. थिएटरमध्येही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
FAQ
1. रश्मिका मंदानाने नेमकं काय वक्तव्य केलं होतं?
रश्मिकाने म्हणलं होतं की, “पुरुषांना आयुष्यात किमान एकदा तरी पीरियड यावा, जेणेकरून त्यांना महिलांना दर महिन्याला कोणत्या वेदना आणि त्रासातून जावं लागतं हे समजू शकेल.”
2. तिच्या या वक्तव्यावर कसा प्रतिसाद मिळाला?
या विधानावर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी तिचं समर्थन केलं तर काहींनी तिला “पुरुषांविषयी असंवेदनशील” म्हणत टीका केली.
3. रश्मिकाने या प्रतिक्रियांवर काय उत्तर दिलं?
तिने सांगितलं की, “मी काहीतरी वेगळं बोलते आणि त्याचा अर्थ काहीतरी वेगळाच काढला जातो. शो किंवा इंटरव्ह्यूला जाणं यासाठीच मला भीतीदायक वाटतं.” तिचा हेतू पुरुषांची टीका नसून महिलांच्या वेदना समजून घेण्याचा होता, असं तिने स्पष्ट केलं.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
INA
(20 ov) 151/9
|
VS |
SIN
155/7(19.1 ov)
|
| Singapore beat Indonesia by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 213/4
|
VS |
IND
162(19.1 ov)
|
| South Africa beat India by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.