Rekha Intimate Scene With Actor: बॉलिवूड अभिनेत्री रेखा आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. आपल्या अभिनयाने, व्यक्तिमत्त्वाने आणि डोळ्यांच्या भावांनी तिने इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रेखाने दक्षिण चित्रपटसृष्टीपासून ते हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आणि प्रत्येक भूमिकेला जिवंत केलं.
रेखाने आपल्या अभिनयात नेहमीच धाडस दाखवलं. मग ते भावनिक, नाट्यमय किंवा रोमँटिक सीन असो. तिने कधीही ‘बोल्ड सीन’पासून पळ काढला नाही. पण तिच्या करिअरमधील एक किस्सा आजही चर्चेचा विषय ठरतो. जेव्हा ती स्वतःपेक्षा तब्बल 13 वर्षांनी लहान अभिनेता अक्षय कुमार सोबत एका सीनदरम्यान ‘आउट ऑफ कंट्रोल’ झाली होती.
हा किस्सा आहे 1996 साली प्रदर्शित झालेल्या ‘खिलाडियों का खिलाड़ी’ या सुपरहिट चित्रपटाचा. या चित्रपटाचं दिग्दर्शन उमेश मेहरा यांनी केलं होतं आणि यात रेखा सोबत अक्षय कुमार व रवीना टंडन मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आणि प्रेक्षकांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळवला.
या चित्रपटातील ‘इन द नाईट नो कंट्रोल’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या गाण्यात रेखा आणि अक्षय कुमार यांच्यात एक बोल्ड आणि इंटीमेट सीन दाखवण्यात आला होता. सांगितलं जातं की, या सीनच्या शूटिंगदरम्यान दोघे थोडे अभिनयामध्ये जास्तच रमले होते आणि रेखा थोडी आउट ऑफ कंट्रोल झाली होती.
रिपोर्ट्सनुसार, सीन करताना रेखाने अक्षयच्या पाठीवर नखं उमटवली होती. हा सीन त्या काळात प्रचंड चर्चेत आला होता. कारण रेखा आणि अक्षयमधील वयाचा फरक आणि त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री दोन्ही लोकांना अचंबित करणारी होती.
या चित्रपटानंतर अक्षय कुमार आणि रेखा यांच्या अफेअरच्या बातम्यांनी बॉलिवूडमध्ये खळबळ माजवली होती. अनेकांनी असा दावा केला की दोघांमध्ये जवळीक वाढली होती. मात्र, अक्षय कुमार आणि रेखा दोघांनीही या अफवांवर कधीच भाष्य केलं नाही. त्यांनी या चर्चांना पूर्णतः दुर्लक्ष केलं.
रेखा आज 70 वर्षांच्या आसपास असूनही तिची लोकप्रियता आणि सौंदर्य दोन्ही तितकंच तेजस्वी आहे. तिचा अभिनय, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व नव्या पिढीतील कलाकारांसाठी आजही प्रेरणास्थान आहे. ‘खिलाडियों का खिलाड़ी’मधील हा किस्सा भलेही जुना असला तरी तो रेखाच्या धाडसी आणि प्रामाणिक अभिनयशैलीचं एक उत्तम उदाहरण म्हणून आजही चर्चेत आहे.
FAQ
रेखा यांचे बॉलिवूडमधील बोल्ड सीन कसे प्रसिद्ध झाले?
रेखा यांनी नेहमी धाडस दाखवले, मग ते भावनिक, नाट्यमय किंवा रोमँटिक सीन असो. त्या कधीही बोल्ड सीनपासून पळ काढल्या नाहीत, आणि त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले.
‘खिलाडियों का खिलाड़ी’ चित्रपट कधी आणि कोणाने दिग्दर्शित केला?
‘खिलाडियों का खिलाड़ी’ हा चित्रपट १९९६ मध्ये प्रदर्शित झाला, आणि दिग्दर्शन उमेश मेहरा यांचे आहे. यात रेखा, अक्षय कुमार आणि रवीना टंडन मुख्य भूमिकेत होते.
चित्रपटातील ‘इन द नाईट नो कंट्रोल’ गाण्यातील सीन कसा?
या गाण्यात रेखा आणि अक्षय कुमार यांच्यात बोल्ड आणि इंटीमेट सीन दाखवला गेला. शूटिंगदरम्यान दोघे अभिनयात रमले आणि रेखा थोडी ‘आउट ऑफ कंट्रोल’ झाली.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.