Shefali Shah on Chaar Chaughi Marathi Natak: मराठी कलाकारांचे आज जगभरात कौतुक होताना दिसते आहे. मग ते नाटकं असो वा चित्रपट वा मालिका. हिंदी कलाकारही मराठी कलाकारांचे कौतुक करताना दिसतात. त्यामुळे त्यांचीही विशेष चर्चा रंगलेली असते त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका नाटकाची. सध्या हे नाटक रंगभूमीवर प्रचंड गाजतं आहे. या नाटकाचं नावं आहे 'चारचौघी'. 1991 साली पहिल्यांदा हे नाटकं रंगभूमीवर आलं होतं. त्यामुळे या नाटकाची तेव्हा फार चर्चा होती. आता हे नाटकं नव्या रूपात, नव्या ढंगात परत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मराठी नाटकांची जाज्वल्य परंपरा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक मराठी नाटकं ही प्रचंड लोकप्रिय झाली असून त्या नाटकातील कलाकारांच्या परफॉर्मन्समुळे त्यांना प्रेक्षकांची मिळणारी वाहवा ही न भूता न भविष्यति अशी होती. बालगंधर्व यांचे फार मोठे उदाहरणं आपल्याकडे आहे. त्यातून डॉ. श्रीराम लागू यांचे 'नटसम्राट', प्रभाकर पणशीकरांचे 'तो मी नव्हेच', त्यानंतर काशिनाथ घाणेकरांचे 'अश्रुंची झाली फुले' त्यानंतर आता भरत जाधव, प्रशांत दामले, प्रिया बापट-उमेश कामत यांच्या नाटकांनाही प्रेक्षकांची मिळणारी दाद ही फार मोठी आहे. 


अनेक बॉलिवूडच्या लोकप्रिय कलाकारांनी मराठी रंगभूमीवरील या कलाकारांचे वेळोवेळी कौतुक केलेले आहे. सध्या रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे यांची या नाटकात प्रमुख भुमिका आहे. स्त्री आणि तिच्या अवतीभवती फिरणारं विश्व हे फार वेगळं आहे. आधुनिक स्त्री ही फार वेगळी आहे परंतु त्यांच्या अडचणी मात्र या बऱ्याशा सारख्याच आहेत. अजूनही स्त्रियांना गृहित धरलं जातं. किंबहूना त्यांच्यावर पुरूषांचेही वर्चस्व असते. त्यांना आर्थिक, सामजिक आणि व्यावसायिक अडचणींनाही सामोरे जावे लागते. त्याचसोबत महिला महिलांमध्येही स्पर्धा, मत्सर आणि द्वेष वाढू लागला आहे. त्यातून महिलांमध्येच वादाला फोडणी मिळू लागली आहे. अशावेळी चर्चा आहे ती म्हणजे या नाटकाच्या ज्वलंत विषयाची. घटस्फोट घेणं हे कुठल्याही महिलेसाठी सोप्पं नाही. परंतु जेव्हा ती वेळ येते तेव्हा प्रत्येक स्त्रीला कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते, त्यातून ती कशी बाहेर पडते हेही या नाटकातून समोर येते. 


हेही वाचा : 'विश्वासच बसत नाही', सलमान खान आमिरच्या लेकीला उद्देशून असं का म्हणाला?


या अभिनेत्री शेफाली शहानं हे नाटकं पाहिलं असून या नाटकावर आणि त्यातील कलाकारांवर तिनं प्रतिक्रिया दिली आहे. तिनं याचा एक व्हिडीओ केला आहे ज्यात ती म्हणते की, ''मी आत्ताच चारचौघी हे नाटक पाहिलं आणि मी भारावून गेले आहे. खूप सुंदर, खूप नाजूक… इतक्या वर्षांनी हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आलं आहे आणि आजही ते तितकंच मनाला भिडतं. सगळ्या कलाकारांची कामं आणि या नाटकाचं लिखाण पाहून मी नि:शब्द झाले आहे. मला खूप आनंद होतोय आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला या नाटकाचा सुंदर अविष्कार बघण्याची संधी मिळाली''