Salman Khan : बॉलिवूड अभिनेत्री अरुणा ईरानी यांचा भाऊ आदि ईरानीनं अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यात सलमान खानसोबत देखील त्यानं काम केलं आहे. दरम्यान, आदि ईरानीनं एका मुलाखतीत सांगितलं की सेटवर सलमान कसा वागायचा आणि एकदा सलमाननं त्याला काचेच्या फ्रेमवर फेकलं आणि रक्तबंबाळ असताना सुद्धा त्याला तिथेच सोडून निघून गेला.
आदिनं ही मुलाखत फिल्मीमंत्र मीडियाला दिली आहे. आदिनं सांगितलं की 'चोरी चोरी चुपके चुपके' या चित्रपटात एकत्र काम करण्याविषयी सांगितलं आणि त्यासोबत आजुबाजूच्या लोकांसोबत त्याची कशी वागणूक होती हे देखील सांगितलं. त्यानं सांगितलं की तो त्याच्या अटी आणि त्याला हवं तसं वागतो. जर त्याला काही करायचं नसेल तर तो ते करणारच नाही. तर त्याची ही वागणूक ही अहंकारानं भरपूर नसून बालिशपणाची लक्षण आहेत.
आदिनं शूटिंग संबंधीत एक घटना सांगितली आहे. आदिनं सांगितलं की " 'चोरी चोरी चुपके चुपके'चं शूटिंग करण्याच्या दरम्यान, त्यानं मला काचेच्या फ्रेमवर फेकलं. काचेच्या तुकड्यांनी माझ्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. रक्त येत होतं. माझी खूप वाईट परिस्थिती झाली होती. जर मी म्हणालो नसतो तर शूटिंग रद्द झाली असती. शूटिंग एक-दोन महिन्यासाठी थांबली असती आणि निर्मात्यांचं नुकसान झालं असतं पण मी निर्मात्यांची साथ दिली."
सलमानची काय प्रतिक्रिया होती याविषयी सांगत आदि म्हणाला, "जेव्हा सुरुवातीला लागलं तेव्हा तर तो बाहेरच निघून गेला. ना माफी मागितली नाही काही. तो सरळ बाहेर निघून गेला. त्यानं नक्कीच रक्त पाहिलं पण तो बाहेर निघून गेला. त्याच्या रुममध्ये जाऊन बसला. तो रागत निघून गेला. त्यानं रक्त नक्कीच पाहिलं आणि गेला. जेव्हा दुसऱ्या दिवशी शूटिंगसाठी तो आला, तेव्हा त्यानं मला त्याच्या रूममध्ये बोलावलं आणि म्हटलं की आदि, मला खरंच वाईट वाटतंय. मी तुझ्या डोळ्यात डोळे घालून पण बोलू शकत नाही. मला खूप वाईट वाटतंय. त्यानं पुढे सांगितलं की सलमान तेव्हा त्याच्याशी खूप चांगल्या प्रकारे बोलला."
हेही वाचा : 'लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात त्याने माझ्या...', 'आश्रम' फेम अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
आदिनं 1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तृष्णा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तो गेल्या अनेक वर्षांपासून सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारत आहे. त्यानं आमिर खानच्या 'दिल', शाहरुख खानच्या 'बाजीगर', गोविंदाच्या अनाडी नंबर 1 आणि ए वेडनसजे आणि वेलकममध्ये देखील दिसला होता. त्याशिवाय तो कसौटी जिंदगी की, सावित्री- एक प्रेम कहानी, शशश फिर कोई है आणि नागिन सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.