धुरंधर चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच चर्चेत आहे. कधी हा चित्रपट राणवीरहुन 20 वर्षांनी लहान सारा अर्जुनमुळे चर्चेत आला तर कधी त्याच्या पटकथेमुळे चर्चेचा विषय ठरला. आता अक्षय खन्नाच्या दमदार अभिनयामळे हा चित्रपट पुन्हा गाजतोय. महत्त्वाची बाब म्हणजे अक्षय खन्ना खलनायकाच्या भूमिकेत असूनही रणवीर सिंगपेक्षा जास्त लक्ष वेधत असल्याचं चित्र आहे. अक्षयने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो एक उत्कृष्ट कलाकार आहे.
धुरंधर आणि छावा चित्रपटांमध्ये त्याची नजर आणि चेहऱ्यावरील प्रत्येक हावभाव संपूर्ण संवाद बोलतात. त्याने एका मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे तो खूप निवडक चित्रपटांमध्ये काम करतो. चित्रपटाची ऑफर येताच तो स्वीकरत नाही तर त्या भूमिकेत तो चाहत्यांना आवडणार की याचा नीट अभ्यास करुन चित्रपट निवडतो. त्याच्या धुरंधर चित्रपटातील अभिनयाचं सर्व स्तरावरुन कौतुक झाल्यानंतर तो पुढे काय करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होतं. आता, खलनायकाच्या भूमिकेत असूनही चित्रपट गाजवणारा अक्षय खन्ना आता दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांच्या ड्रीम प्रोजेक्ट 'महाकाली' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीत एक पूर्णपणे नवीन आणि आश्चर्यकारक पैलू ठरणार आहे.
विश्लेशक आणि समीक्षक काय म्हणाले?
"अक्षयने दाखवून दिले आहे की दमदार अभिनयासाठी ओरडणे आवश्यक नसते. चित्रपटात त्याच्या शांततेला इतके महत्त्व होते की प्रत्येक दृश्य महत्त्वाचे बनले. या चित्रपटानंतर, तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे असून त्याची 'माहाकाली'मधील शुक्राचार्याची भूमिका चाहत्यांना खूप आवडेल"
हे ही वाचा: वयाच्या 50व्या वर्षी अविवाहित आहे Dhurandhar स्टार अक्षय खन्ना, म्हणाला “फक्त लग्नासाठी..."
महाकाली पूर्णपणे वेगळ्या अवतारात
चित्रपटाच्या दिग्दर्शकला एक असा अभिनेता हवा होता जो शांतपणे त्याची क्रुरता मांडेल संपूर्ण सेटवर नियंत्रण ठेवू शकेल, त्याच्या डोळ्यात गूढ असेल, त्याचा आवाज लहान असेल पण आवाजात वजन असेल आणि धमकी देणारी चाल असेल. यासाठी अक्षय त्याची पहिली पसंती होता. हिरोलाही लाजवणारा खलनायक अक्षय खन्ना, क्रुर औरंगजेब, भयानक रहमान डकैतनंतर आता शांत पण चालाख शुक्राचार्य कसा साकारणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे.
हे ही वाचाः भारतच नाही तर जगभरात 'धुरंधर' चित्रपटाचा डंका, 4 दिवसात कमावले तब्बल इतके कोटी
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.