Actress Who was Diagnosed with Cancer : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे सगळ्यांसमोर त्यांच्या नात्याची कबुली देतात. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही व्यक्तीला त्यातल्या त्यात सेलिब्रिटीला त्याच्या नात्याविषयी सगळ्यांना सांगण सोपं नसतं. त्यात अनेकदा ते जगजाहिरपणे त्यांच्या नात्याविषयी सांगतात आणि ते नातं यशस्वी होत नाही. त्यानंतर त्यांच्यात हिंम्मत राहत नाही. आज आपण अशाच एका अभिनेत्री विषयी जाणून घेणार आहोत. 90 च्या दशकातील सगळ्यात यशस्वी आणि सुंदर अभिनेत्री मनीषा कोयराला आता तिच्या कमबॅकसाठी तयार आहे.
तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिचा प्रवास आणि कॅन्सरशी असलेल्या तिच्या संघर्षासोबत नाती कशी कळाली त्याविषयी सांगितलं होतं. तिनं सांगितलं होतं की सम्राटला ती फेसबूकवर भेटली होती. तिनं 19 जून 2010 मध्ये पारंपारिक नेपाळी पद्धतीनं सम्राटशी लग्न केलं आणि 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्याचवर्षी मनीषाला कॅन्सरचं निदान झआलं आणि ती न्यूयॉर्कला गेली. तर 2015 मध्ये मनीषानं घोषणा केली की तिची कॅन्सरपासून मुक्तता झाली आहे आणि आता ती पुन्हा एकदा तिच्या करिअरची सुरुवात करणार आहे.
कॅन्सरशी लढा देत असताना तिला नातेवाईकांविषयी अनेक महत्त्वाच्या गोष्टी कळल्या. त्यांनी सांगितलं की कॅन्सरच्या लढा देत असताना ती तिच्या मित्रांवर अवलंबून होती पण त्यापैकी काहीच तिच्यासोबत राहिले आणि फक्त कुटुंबातील काही जवळचे सदस्य तिच्यासोबत राहिले. त्यांनी हे देखील सांगितलं की आर्थिक रित्या तिला कोणत्याही गोष्टीची चिंता नसताना तिच्या कुटुंबातील अनेक लोक तिच्या या संघर्षाच्या वेळी तिला भेटायला आले नाही. याच अनुभवानं तिला थेरेपी घेण्यासाठी प्रेरित केलं. जे काही घडलं त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता.
दरम्यान, NDTV ला दिलेल्या एका मुलाखतीनुसार, 'मनीषानं सांगितलं की तेव्हा जेव्हा कॅन्सरशी संघर्ष करत होती तेव्हा मित्र आणि कुटुंबासोबत असलेल्या नात्याला बदललं. मनीषा म्हणाली, हा एक वेगळा प्रवास होता. त्यातून खूप शिकायला मिळालं. मला खरंच विश्वास आहे की माझे मित्र आहेत, मी विचार केला होता की सोबत पार्टी करणं, सोबत फिरणं, सोबत मज्जा करणं तर लोकं आता मला जेव्हा त्यांची गरज आहे तेव्हा माझ्यासोबत राहतील. पण असं झालं नाही. कोणाच्या त्रासात किंवा दु:खात सोबत राहत नाहीत. आपण नेहमीच त्रासापासून पळत असतो. हा मानवी स्वभाव आहे. मी एकटी आहे याची मला जाणीव झाली. मला याची जाणीव झाली की माझ्याजवळ माझ्या कुटुंबातील जवळचे लोक होते.'
हेही वाचा : 'मी माधुरीला ठेल्यावर टॉर्चर केलं!' खलनायकानं सांगितला विनयभंगाच्या सीनचा किस्सा; म्हणाला, 'ती खूप...'
याविषयी सांगत मनीषा म्हणाली की 'माझ्याकडे खूप मोठं कोयराला कुटुंबा आहे. तरी सुद्धा माझ्यासोबत कोणी नव्हतं. माझं खूप मोठं कुटुंब आहे आणि सगळे श्रीमंत आहेत. सगळे काही ते सगळं अफोर्ड करू शकत होते. पण माझे आई-वडील, भाऊ आणि त्याची पत्नी माझ्यासोबत होते. फक्त इतकेच लोकं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेव्हा कोणी नसतं तेव्हा हेच लोकं आपल्यासोबत राहतात.' दरम्यान, मनीषा कोयरालानं 'हीरामंडी' या सीरिजमधून पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात कमबॅक केलं होतं.