राज कुंद्राच्या हॉट्शॉट्समध्ये झळकली, पण पतीच्या नजरेत कायमची उतरली

निकिताने आपल्या ट्विटमध्ये झारखंडमधील एका मुलीसोबत घडलेला प्रकार देखील उघडकीस आणला आहे. 

Updated: Jul 25, 2021, 06:09 PM IST
राज कुंद्राच्या हॉट्शॉट्समध्ये झळकली, पण पतीच्या नजरेत कायमची उतरली

मुंबई : बिझनेसमन राज कुंद्रा (Raj Kundra ) याच्या पॉर्नफिल्म प्रकरणात दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. त्यात आता झारखंडमधील एका मुलीला राज कुंद्राच्या अ‍ॅपसाठी काम करण चांगलच महागात पडल्याचं समोर आलं आहे.

पूनम पांडे (Poonam Pandey) आणि सागरिका शोना (Sagarika Shona) या मॉडेल्सने आतापर्यंत राज कुंद्रावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.  या प्रकरणात आणखी एका मॉडेलने मौन सोडलं आहे. निकिता फ्लोरा सिंग या मॉडेलने ट्विट करत राज कुंद्राच्या हॉट्शॉट्स अॅपसाठी आपल्याला ही विचारण्यात आल्याचं सांगितलं आहे. 

पण आपण या ऑफरसाठी नकार दिल्याचं तिनं सांगितलं आहे. सोबतच आणखी एका मुलीने या अ‍ॅपसाठी काम केल्याने तिला तिच्या पतीने घटस्फोट दिल्याचं म्हटलंय.

मॉडेल निकिताचा मोठा खुलासा

निकिता फ्लोरा सिंगने नुकतच एक ट्विट केले आहे. ज्यात तिने राज कुंद्राचा पीए उमेश कामतने दिला न्यूड शूटसाठी विचारल्याचं म्हटलं आहे. सोबतच एका दिवसासाठी 25 हजार रुपये देणार असल्याची ऑफर दिली होती असा खुलासा ही केला आहे. 

राज कुंद्रासाठी न्यूड शूट, पतीकडून घटस्फोट

पुढे निकिताने आपल्या ट्विटमध्ये झारखंडमधील एका मुलीसोबत घडलेला प्रकार देखील उघडकीस आणला आहे. राज कुंद्राच्या हॉटशॉट्समध्ये झारखंडमधील एका मुलीने न्यूड शूट केलं होतं. या शूटनंतर मुलीला तिच्या पतीने  घटस्फोट दिल्याचा खुलासा निकिताने केला आहे. या मुलीला राज कुंद्राच्या अॅपसाठी काम करणं महागात पडलं आहे.