`पुष्पा 2` नंतर अल्लू अर्जुन करणार आणखी एक धमाका, बॉलिवूडशी आहे संबंध
सध्या सोशल मीडियावर `पुष्पा 2` चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने अवघ्या 6 दिवसांमध्ये 950 कोटींची कमाई केलीय. त्यानंतर आता अल्लू अर्जुन आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत आहे.
साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अवघ्या 6 दिवसांमध्ये 950 कोटींची कमाई केली आहे. 'पुष्पा 2' हा चित्रपट लवकरच 1000 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. परंतु, 'पुष्पा 2' चित्रपटाच्या यशानंतर आता चाहते वेगळ्याच गोष्टीची वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुनचा हा पुढचा चित्रपट आहे. काम कधी सुरू होणार? कोणासोबत येणार चित्रपट? सर्व काही निष्पन्न झाले आहे.
'पुष्पा 2' बाबत आधीच निर्माण झालेल्या वातावरणामुळे हा चित्रपट धमाकेदार कमाई करणार असल्याचे स्पष्ट झाले होतं. मात्र या चित्रपटाच्या कमाईसोबतच आता अल्लू अर्जुनच्या पुढच्या प्रोजेक्टकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2' आधीच चांगली कमाई करत आहे.
'पुष्पा 2' नंतर अल्लू अर्जुन दिसणार या चित्रपटात
अल्लू अर्जन लवकरच दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास यांच्यासोबत त्याचा पुढचा चित्रपट करणार आहे. नुकतीच बॉक्स ऑफिस इंडियावर एक बातमी प्रसिद्ध झाली. ज्यामध्ये या दोघांची नुकतीच चित्रपटातील कामासंदर्भात भेट झाल्याचे समोर आले आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट जवळपास पूर्ण झाली असून लवकरच ती अल्लू अर्जुनला दाखवण्यात येणार आहे.
दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवासचा पहिला पॅन इंडिया चित्रपट असणार आहे. ज्यामध्ये अल्लू अर्जुन दिसणार आहे. त्याचबरोबर अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाची निर्मिती Sithara Entertainments करणार आहे. अलीकडेच या अहवालावरून असे समोर आले आहे की, चित्रपटाची अधिकृत घोषणा जानेवारी 2025 मध्ये केली जाऊ शकते. संक्रांतीच्या नंतर या चित्रपटाची घोषणा होऊ शकते असा अंदाज आहे. कारण या दिवसांमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात.
या चित्रपटात असणार बॉलिवूड कलाकार
काही दिवसांपूर्वीच अल्लू अर्जुनचा पुढील चित्रपट प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे. ज्यामध्ये बॉलिवूडमधील कलाकांराना कास्ट केले जाऊ शकते अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. याआधीच्या त्रिविक्रमचा आधीचा चित्रपट हा महेश बाबू-गुंटूर करमसोबत होता. परंतु, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही.