close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

इन्स्टाग्रामवरील 'या' पोस्टमुळे जायरा पुन्हा चर्चेत

अभिनेत्री जायरा वसीम पुन्हा चर्चेत...

Updated: Jul 13, 2019, 04:43 PM IST
इन्स्टाग्रामवरील 'या' पोस्टमुळे जायरा पुन्हा चर्चेत

मुंबई : दंगल या चित्रपटातून बॉलिवू़मध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री जायरा वसीमने बॉलिवूडमधून संन्यास घेतल्याचे काही दिवसांपुर्वी जाहीर केले होते. त्यानंतर या प्रकरणावर सिनेविश्वातून अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर जायरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही तासापुर्वी जायराने तिच्या इन्स्टाग्राम अकांऊडवर एक फोटो आणि पोस्ट शेअर केली आहे. ज्यात आपल्या चाहत्यांशी भावूक आणि आध्यात्मिक संवाद साधला आहे. 

जायराने शेअर केलेल्या फोटोत एक अस्पष्ट भिंत दिसतेय. या फोटोला साजेशी कॅप्शनही तिने दिली आहे. तुमच्या मनातील ज्वाला विझू देऊ नका. नैराश्याच्या दलदलीतील स्वत:च्या मनातील अद्वितीय ठिणगी सतत पेटत ठेवा. मनाप्रमाणे जगायला मिळत नसेल तर स्वत:च्या मनातील आत्म्याच्या नायकला एकटे सोडू नका, असे जायराने पोस्टमध्ये लिहलं आहे.  

जायराने १३ दिवसापुर्वी एक पोस्ट लिहतांना म्हटले होते की, ५ वर्षापुर्वी मी जो निर्णय घेतला होता यामुळे माझे आयुष्य पुर्णपणे बदलले होते. त्यावेळीच मी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. माझी ही यात्रा फार अवघड आणि थकावणारी होती. या पाच वर्षात मी माझ्या अंतरात्म्यासोबत लढत होती. माझ्या या छोट्या आयुष्यात मी इतकी मोठी लढाई लढू शकत नाही. त्यामुळे मी बॉलिवूडमधून संन्यास घेतला. अशी पोस्ट जायराने सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर बॉलिवूडमधून अनेक सेलेब्रिटीच्या प्रतिक्रिया आल्या होत्या.

जायराने हा निर्णय दबावाखाली घेतला असेल असे काही सेलेब्रिटीचे मत होते. जायरा लवकरच 'द स्काई इज पिंक' या चित्रपटात झळणार आहे. या चित्रपटात जायरा प्रियंका चोप्राच्या मुलीच्या भुमिकेत रूपेरी पद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात फरहान अख्तर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.