राजपाल यादवला नेमकं झालंय तरी काय? माफीच्या व्हिडीओनंतर दुसरा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल
दिवाळीच्या दिवशी माफी मागितल्यानंतर राजपाल यादवला ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर त्याचा नवीन वादग्रस्त व्हिडीओ समोर आला आहे.
Rajpal Yadav Troll: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 3 चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांमध्ये चर्चा होती. या चित्रपटात छोटे पंडितची भूमिका साकारणारा राजपाल यादव पुन्हा एकदा वादात सापडला आहे. ऐन दिवाळीमध्ये राजपाल यादवने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो दिवाळीत फटाके न फोडण्याबाबत बोलत होता. परंतु, या व्हिडीओनंतर त्याला अनेक टीकांना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्याने दिवाळीच्या दिवशी माफी मागणारा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यानंतर राजपाल यादवने तो व्हिडीओ देखील डिलेट केला. आता त्याचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका व्यक्तीचा फोन हिसकावून घेत असल्याचं दिसत आहे.
उत्तर प्रदेशमधील एका व्यक्तीने अभिनेता राजपाल यादवला त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल विचारले. त्यासोबतच त्या व्यक्तीने त्याला दिवाळीच्या व्हायरल व्हिडीओवर देखील प्रश्न विचारला. मात्र, राजपाल यादवने कोणतीही प्रतिक्रिया न देता त्या व्यक्तीचा प्रश्न पूर्ण होण्यापूर्वीच त्याचा फोन हिसकावून घेताना दिसला.
व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?
राजपाल यादवचा दिवाळीच्या दिवशी माफी मागणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं. त्यानंतर राजपाल यादवने तो व्हिडीओ डिलीट केल्यानंतर त्याचा आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक पत्रकार राजपाल यादवला प्रश्न विचारताना दिसत आहे.
ज्यामध्ये तो म्हणत आहे की, 'राजपाल जी, तुमचा आगामी चित्रपट कोणता येणार आहे? किंवा कोणता चित्रपट आला आहे? यावर राजपाल यादव म्हणाला की, दीड महिन्यात एक चित्रपट पाहायला मिळेल. त्यानंतर पत्रकाराने राजपाल यादवाला दिवाळीमधील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर प्रश्न विचारला असता, राजपाल यादव त्याच्यावर संतापला आणि त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला.
राजपाल यादवचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या त्याच्या व्हिडीओवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यासोबतच त्याच्या अशा वागण्यावर टीका देखील होत आहे.