घटस्फोटानंतर पत्नी दुरावली, आता मुलांनी देखील सोडली हृतिकची साथ
घटस्फोटाच्या एवढ्या वर्षांनंतर सुझानने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय...
मुंबई : अभिनेता हृतिक रोशन आणि पहिली पत्नी सुझान खान त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत. असं असताना देखील ते मुलांसाठी एकत्र येतात. पण आता घटस्फोटाच्या एवढ्या वर्षांनंतर सुझानने मुलांबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे. घटस्फोट झाल्यापासून सुझान पती हृतिक रोशनपासून एका वेगळ्या बिल्डिंग राहत होती. एका रिपोर्टनुसार आता तिने स्वतःचं घर घेतलं आहे. एवढंच नाही तर सुझान तिच्या दोन मुलांसोबत नव्या घरी शिफ्ट होणार आहे.
सुझान खानचे हे घर सी-फेसिंग आहे. सुझानचं नवं घर हृतिक रोशनच्या घरापासून जवळ आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सुझानने हे नवीन घर भाड्याने घेतलेले नसून तिने ते स्वतः खरेदी केलं आहे. घटस्फोट झाला तरीही दोघांमध्ये मैत्रीचे नाते आहे.
हृतिक आणि सुझान मुलांसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी परदेशी देखील जात असतात. दोघांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर हृतिकने 2000 मध्ये गर्लफ्रेंड सुझान खानसोबत लग्न केले. लग्नानंतर सुझानने दोन मुलांना जन्म दिला.
पण लग्नाच्या 14 वर्षानंतर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले. दोघांनी संमतीने घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटाचं कारण हृतिक आणि कंगना रानौतचं नातं असल्याचं म्हटलं जात होतं.