)
Aishwarya Rai : बॉलिवूडचे दिग्गज कुटुंब, बच्चन परिवार, एआय आणि डीपफेक तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाविरुद्ध आता मोठ्या प्रमाणावर पाऊल उचलत आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा समावेश आहे. अलीकडेच ऐश्वर्या आणि अभिषेकने दिल्ली हायकोर्टात गूगल आणि यूट्यूबवर 4 कोटी रुपये मूल्याचा दावा दाखल केला आहे. या दाव्यात त्यांनी आरोप केला आहे की या प्लॅटफॉर्म्सवर त्यांच्या फोटोंचा आणि व्हिडिओंचा एआय आणि डीपफेकच्या माध्यमातून गैरवापर केला जात आहे.
त्यांच्या या तक्रारीत म्हटले आहे की, एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी याप्रकारचा कंटेंट वापरण्यात येतो, ज्यामुळे कलाकारांच्या प्रतिमांचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. फाईलिंगमध्ये म्हटले आहे, 'एआय प्लॅटफॉर्मला असे कंटेंट प्रशिक्षणासाठी दिले जाते ज्यामुळे कलाकारांना निगेटिव्ह रीतीने दाखवले जाते आणि त्यांचे अधिकार मोडले जातात. परिणामी, अशा चुकीच्या माहितीचा प्रसार अधिक वाढतो असं तक्रारीमध्ये म्हटलं आहे.
अभिषेक-ऐश्वर्या यांनी असेही नमूद केले की, हे कंटेंट यूट्यूबवर अपलोड होतात. लोक पाहतात आणि नंतर ट्रेनिंगसाठी वापरले जातात. त्यामुळे अशा गैरवापराची घटना अनेक पटीने वाढू शकते.
याबाबत याआधी देखील अमिताभ बच्चन, अनिल कपूर आणि जैकी श्रॉफसारख्या कलाकारांनी आधीच उचलले आहे. जे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक अधिकारांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी केले आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, कलाकारांनी यूट्यूबच्या धोरणांबाबतही चिंता व्यक्त केली आहे आणि म्हटले आहे की थर्ड पार्टी कंटेंट आणि प्लॅटफॉर्मवरील नियम चिंताजनक आहेत.
अभिषेक आणि ऐश्वर्याची प्रेमकथा 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ढाई अक्षर प्रेम के’ आणि 2003 मध्ये आलेल्या ‘कुछ ना कहो’ या चित्रपटातून सुरू झाली. त्यानंतर 2005-06 मध्ये ‘उमराव जान’ शूटिंग दरम्यान त्यांचे प्रेम अधिक वाढले. न्यूयॉर्कमध्ये अभिषेकच्या चित्रपट ‘गुरु’ प्रीमियरनंतर त्यांनी ऐश्वर्याला प्रपोज केले. अखेरीस, 20 एप्रिल 2007 रोजी दोघांची भव्य विवाह सोहळ्यात घडली आणि ऐश्वर्या राय बच्चन बनली. त्यांना एक मुलगी आहे. तिचं नाव आराध्या बच्चन आहे.
अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्याबद्दल बर्याच वेळा अफवा पसरल्या आहेत, परंतु अभिषेकने याचे आधी खंडन केले आहे. जरी अभिषेक सार्वजनिकपणे ऐश्वर्याबद्दल कमी बोलत असला तरी त्याच्या जुन्या मुलाखतीत ऐश्वर्याचे कौतुक अजूनही चाहत्यांच्या लक्षात आहे.
FAQ
बच्चन परिवाराने एआय/डीपफेकविरुद्ध काय कारवाई केली?
अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी एआय आणि डीपफेक तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाविरुद्ध मोठी पावले उचलली आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेकने दिल्ली हायकोर्टात गूगल आणि यूट्यूबविरुद्ध ४ कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे.
दाव्यात कोणते आरोप केले गेले?
तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या फोटोंचा आणि व्हिडिओंचा एआय मॉडेल्सना प्रशिक्षणासाठी गैरवापर होतो, ज्यामुळे कलाकारांना नकारात्मक दाखवले जाते आणि वैयक्तिक अधिकारांचे उल्लंघन होते. हे कंटेंट यूट्यूबवर अपलोड होऊन प्रसारित होते.
एआय गैरवापराचे परिणाम काय?
एआय प्लॅटफॉर्मवर चुकीची माहिती प्रशिक्षणासाठी वापरली जाते, ज्यामुळे कलाकारांच्या प्रतिमेचा गैरवापर होतो आणि नकारात्मक कंटेंटचा प्रसार वाढतो, असा दावा तक्रारीत केला आहे.