Aishwarya Rai Bachchan Car Accident : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचा अपघात झाला आहे. मुंबईत काल 26 मार्च रोजी हा अपघात झाला. ऐश्वर्याच्या गाडीला बेस्ट बसने धडक दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या अपघातात कोणतीही दुखापत किंवा मोठे नुकसान झाले नाही. ऐश्वर्याला काही झालेलं नाही ती पूर्णपणे ठीक आहे. ऐश्वर्याच्या जवळच्या सुत्रांनी देखील ही माहिती दिली आहे. त्यासोबत हा मोठा अपघात नसल्याचं म्हटलं आहे. पण चर्चा या गोष्टीची आहे की ऐश्वर्याच्या बॉडीगार्डनं बस चालकाना कानशिलात लगावली?
द फ्री प्रेस जर्नलच्या माहितीनुसार, हा अपघात अमिताभ बच्चन यांच्या जुहू येथील तारा रोडं येथे असलेल्या त्यांच्या बंगल्याच्या जवळ झाला. त्या रिपोर्ट्मध्ये असं म्हटलं आहे की या सगळ्या प्रकरणानंतर ऐश्वर्याच्या बाऊंसरनं बस चालकाला कानशिलात लगावली. त्यानंतर बंगल्याच्या इथे असलेल्या कर्मचाऱ्यांनी माफी मागितली आणि बस चालकानं पोलिसात तक्रार दाखल न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यात किती तथ्य आहे याविषयी कोणतीही माहिती ही अजून समोर आलेली नाही. दरम्यान, तिच्या गाडीला एक छोटासा देखील डेंट आलेला नाही असं म्हटलं जातं.
दरम्यान, ऐश्वर्या सगळ्यात शेवटी दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांचा मुलगा कोनार्कच्या लग्नात दिसली होती. कोनार्कनं गर्लफ्रेंड नियतिसोबत लग्न केलं. या लग्नात संपूर्ण बच्चन कुटुंबानं हजेरी लावली होती. सोशल मीडियावर या कार्यक्रमातील अनेक फोटो व्हायरल झाले होते. ऐश्वर्या आणि अभिषेक जेव्हा कोनार्क आणि नियती यांना शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर गेले तेव्हा अनेक फोटो व्हायरल झाले.
हेही वाचा : 'जितकं आयुष्य आहे तितकं...', जीवे मारण्याच्या धमकीवर सलमान खान पहिल्यांदाच बोलला
कार्यक्रम आणि फॅशन शोमध्ये सगळ्यात जास्त ऐश्वर्या स्पॉट होते. मात्र, जेव्हा ऐश्वर्या मुंबईत घरातून बाहेर पडते तेव्हा तिला कोणी स्पॉट करू शकत नाही. ऐश्वर्या सोशल मीडियावर खूप सक्रिय नसल्याचे पाहायला मिळते. ती वाढदिवस आणि लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं फोटो शेअर करताना दिसते. त्याशिवाय पॅरिस फॅशन वीकला घेऊन काही पोस्टर शेअर करताना दिसली. ऐश्वर्या प्रमाणे लेक आराध्या बच्चन सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते.
ऐश्वर्याच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती मनी रत्नम यांच्या 'पोन्नियेन सेल्वन 2' मध्ये दिसली. तिनं यात नंदिनी ही भूमिका साकारली होती.