कोल्हापूर : कोल्हापुरात रविवारी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. पण, त्यादरम्यानच सभेत प्रचंड गोंधळ पहायला मिळाला. ज्यानंतर अखेर सभेचं कामकाज गुंडाळण्यात आलं. या गोंधळामध्येच कार्यवाहपदी असणाऱ्या अभिनेते सुशांत शेलार यांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न झाला. इतकच नव्हे तर त्यांच्यावर कागदपत्रही भिरकावण्यात आली. त्यामुळे या वादाला वेगळं वळण मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाषण संपल्यानंतर अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी ब्रेक जाहीर करत ते तिथून बाहेर पडले. मात्र संतापलेल्या सभासदांनी त्यांना बाहेर जायला मज्जाव करत दारातच रोखलं. 



सभा सोडून जाऊ नका, अशी भूमिका घेत सभासदांनी संताप व्यक्त केला. खोटा गुन्हा दाखल केलेल्या तीन सदस्यांचं सभासदत्व रद्द करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर व्यासपीठावरून खाली जाऊन संचालक मुद्दा मांडणार असतील तर त्यांनी महामंडळाचा राजीनामा द्यावा, असं मेघराज राजेभोसले यांनी रणजीत जाधव यांना सुनावलं. त्यातच भाषण संपवून मेघराज राजेभोसले तातडीने सभागृहाबाहेर पडू लागले त्यावर सभासदांनी आक्रमक भूमिका त्यांना दारातच रोखलं आणि सभेत यायला भाग पाडलं.  


दरम्यान झाल्या प्रकाराविषयी कार्यवाहक सुशांत शेलार यांनी खेद व्यक्त केला. जो कागद भिरकावण्यात आला, तो न्यायालयाचा निकाल होता. त्याचा अवमान करण्यात आला आहे, अशा शब्दांत सुशांत शेलार यांनी त्यांची संतप्त प्रतिक्रिया दिली. आपण कोणती कागदपत्र कोठे आपटत आहोत, य़ाचं किमान भान असावी असं म्हणत महामंडळ संचालक, अध्यक्ष यांच्यावर दमदाटी करणाऱ्याच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली.