बॉलिवूडमधील प्रसिद्ध जावई आणि सासूची जोडी पडद्यावर करणार होती रोमान्स, पण त्या एका 'नाही'ने लागली रेखाची वर्णी, सुपरहिट ठरला चित्रपट

Bollywood Kissa : बॉलिवूडमध्ये अनेक कुटुंब आहे, जिथे नवरा बायको, सासू सासरे यांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. एकाच कुटुंबातील या अभिनेता अभिनेत्रीने पडद्यावर वेगवेगळे रोल केले आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध जावई आणि सासूची जोडी एका चित्रपटात रोमान्स करताना दिसणार होते. पण त्या एका 'नाही'ने...29 वर्षांपूर्वी आलेल्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.     

नेहा चौधरी | Updated: Apr 17, 2025, 05:42 PM IST
बॉलिवूडमधील प्रसिद्ध जावई आणि सासूची जोडी पडद्यावर करणार होती रोमान्स, पण त्या एका 'नाही'ने लागली रेखाची वर्णी, सुपरहिट ठरला चित्रपट

Bollywood Kissa in Marathiबॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट आहेत, ज्यामध्ये कधी आई-मुलगी, सासू-सून किंवा सून-सासरे आणि नवरा-बायको यांनी काम केले आहेत. अगदी बहीण-भाऊ, भाऊ - भाऊ एकाच चित्रपटात प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतात. सून आणि सासरे ते म्हणजे ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांनी डान्स फ्लोअरवर आपला जलवा दाखवला आहे. बॉलिवूडमधील हे सून आणि सासऱ्याचं गाण खूप गाजलं होतं. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल याच बॉलिवूडमधील प्रसिद्ध जावई आणि सासूची जोडी पडद्यावर चक्क रोमान्स करताना दिसणार होते. 29 वर्षांपूर्वी आलेला चित्रपट सुपरहिट ठरला होता. पण सासूबाईंच्या त्या एका नाहीमुळे या चित्रपटात रेखाची वर्णी लागली होती. 

कोणता होता हा चित्रपट?

आम्ही बोलत आहोत, 1996 मध्ये आलेल्या 'खिलाडियों के खिलाडी' या चित्रपटाबद्दल. 6.50 कोटींचा बजेटमध्ये तयार झालेला या चित्रपटाने जगभरात 25.15 कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटात अक्षय कुमार आणि डिंपल कपाडिया यांच्यामध्ये रोमान्स होणार होता. पण त्या एका नाहीमुळे रेखाची वर्णी लागली. 

एका 'नाही'मुळे सासू आणि जावयात....

या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात रेखाने अक्षय कुमारसोबत काम केले होते. या चित्रपटात रेखाची नकारात्मक भूमिका होती. हा चित्रपट त्या वर्षीचा पाचवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. जिथे रेखाने चित्रपटात मॅडम मायाची भूमिका साकारली होती. दुसरीकडे, अक्षय कुमारने अक्षय खरोदिया मल्होत्राची भूमिका साकारली. एवढंच नाही तर चित्रपटात अक्षय कुमार आणि रेखा यांचे अनेक इंटिमेट सीन्स दाखवण्यात आले होते. 

पण तुम्हाला माहिती आहे का की, या चित्रपटातील मॅडम मायाची भूमिका पहिल्यांदा डिंपल कपाडियाला ऑफर करण्यात आली होती. आयएमडीबीच्या मते, डिंपल कपाडियाने ही भूमिका करण्यास नकार दिला होता. मात्र, या नकारामागील कारण डिंपल कपाडियाच्या तारखा होत्या. तिने इतर चित्रपटांसाठी तारखा आधीच दिल्या होत्या. ज्यामुळे ती अक्षय कुमारसोबत चित्रपट करू शकली नाही. मात्र, नंतर तिला या निर्णयावर नक्कीच आनंद झाला असेल, कारण जर तिने होकार दिला असता तर तिला अक्षय कुमारसोबत एक रोमँटिक गाणे करावे लागले असते. जे नंतर रेखा आणि अक्षय कुमार यांच्यावर करण्यात आलं होतं. 

अक्षय आणि ट्विंकलचे लग्न कधी झाले?

हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अक्षय कुमारचे डिंपल कपाडियाच्या मुलीशी लग्न झालेले नव्हतं. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांचं लग्न 2001 मध्ये झाले. पण हा निर्णय अभिनेत्रीसाठी चांगला ठरला. नाहीतर, मला माझ्या जावयाशी इंटिमेट सीन केल्याबद्दल आयुष्यभर पश्चाताप झाला असता, असं अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.