आलिया 2019ची आशियातील सर्वात सेक्सी महिला

दीपिका, कतरिना प्रियांकाला सारख्या अभिनेत्रींना मागे टाकत आलिया ठरली 2019ची आशियातील सर्वात सेक्सी महिला.

Updated: Dec 12, 2019, 11:47 PM IST
आलिया 2019ची आशियातील सर्वात सेक्सी महिला

मुंबई : दीपिका, कतरिना प्रियांकाला सारख्या अभिनेत्रींना मागे टाकत आलिया ठरली 2019ची आशियातील सर्वात सेक्सी महिला. अभिनेत्री आलिया भट ठरलीये २०१९ मधील सर्वात सेक्सी आशियाई महिला. होय प्रियांका , दीपिका, कॅटरिला सारख्या लीडिंग लेडीजना मागे टाकत आलिया भट्टनं या यादीत पहिला क्रमांक पटकावलाय.

‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या आलियासाठी यंदाच वर्ष खास ठरलंय. या वर्षभरात तिला अनेक पुरस्कार मिळाले. तसंच तिचा ‘गली बॉय’ हा सिनेमा ऑस्करसाठी भारतातून अधिकृतपणे पाठविण्यात आला. 

ऑनलाईन मतदान, मीडिया कव्हरेज, सोशल मीडियावरील प्रतिक्रिया आदींच्या आधारे ‘सेक्सिएस्ट एशियन फिमेल’ ची यादी ठरते..  या यादीत दीपिका गेल्यावर्षी अव्वल स्थानी होती. 

यावर्षी ती एक क्रमांक खाली घसरून दुसऱ्या स्थानी आलीये. तर प्रियांका चोप्रा, कतरिना कैफला सुद्धा आलियानं जबरदस्त टक्कर दिलीये. आता पुढच्या वर्षी रिलीज होणा-या आलियाच्या ब्रम्हास्त्र या सिनेमाकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष्य लागलंय.