मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर लवकरचं पहिल्या बाळाला जन्म देणार आहेत. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर कपूर कुटुंबातून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आलिया लवकरचं आई होणार आहे. खुद्द आलियाने सोनोग्राफी दरम्यानचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'लवकरचं आमचं बाळ येणार आहे...' असं लिहिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता देखील आलियाचे प्रेग्नेंसी दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये आलिया काळ्या रंगाच्या सैल कपड्यांमध्ये दिसत असून अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर मेकअप देखील दिसत नाही. 



सैल कपडे आणि नो मेकअप लूकमध्ये आलिया सुंदर दिसत आहे. आलिया आणि रणबीरच्या प्रत्येक चाहत्याला त्यांच्या बाळाची प्रतीक्षा आहे. या फोटोमध्ये आलिया करण जोहर आणि एका चाहत्यासोबत पोज देताना दिसत आहे.


सध्या कपूर आणि बट्ट कुटुंबात आनंदाच वातावरण आहे. दरम्यान, 14 एप्रिल रोजी आलिया आणि रणबीर विवाहबंधनात अडकले. त्यानंतर साधारण दुसऱ्याच महिन्यात आलियानं केलेली ही पोस्ट पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या.