समांथा दुसरं लग्न करतेय...आज? त्याआधीच प्रियकराच्या Ex Wife ची खोचक पोस्ट चर्चेत; 'Desparate...'

Samantha Ruth Prabhu and Raj Nidimoru's wedding : अभिनेत्री समांथा रुथ प्रभू तिचा कथित प्रियकर राज निदीमोरु याच्याशी एका छोटेखानी समारंभात लग्न करत असल्याचं म्हटलं जात आहे. पण, त्याआधी...   

सायली पाटील | Updated: Dec 1, 2025, 01:08 PM IST
समांथा दुसरं लग्न करतेय...आज? त्याआधीच प्रियकराच्या Ex Wife ची खोचक पोस्ट चर्चेत; 'Desparate...'
Amid wedding rumours Samantha Ruth Prabhu and Raj Nidimorus wedding ex wife post saying desperate people

Samantha Ruth Prabhu and Raj Nidimoru's wedding : दाक्षिणात्य सिनेविश्वातील अभिनेत्री अशी लोकप्रियता मिळवणाऱ्या समांथा रुथ प्रभूनं विविधभाषी प्रेक्षकांची मनंसुद्धा जिंकली. तिच्या रुपानं अनेकांनाच घायाळ केलं. व्यक्तिगत जीवनात अनेक अडथळ्यांचा सामना करून पुढे आलेल्या या अनेकांच्याच आवडीच्या अभिनेत्रीनं आता आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. 

Add Zee News as a Preferred Source

काही महिन्यांपूर्वी तिचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्य यानं अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्याशी लग्न केलं आणि त्यामोगामाग समांथाचं नावही राज निदीमोरुशी जोडलं गेलं. आता म्हणजे समांथा 1 डिसेंबरला या लग्नासाठी सज्ज असून हा तिच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. एकिकडे सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या जीवनातील या आनंदाच्या चर्चांनी चाहतेसुद्धा भारावले आहेत. तर, दुसरीकडे समांथाचा कथित प्रियकर राज निदीमोरु याच्या Ex Wife च्या सोशल मीडियानं सर्वांच्या नजरा वळवल्या. 

खोचक पोस्टचा नेमका अर्थ काय? 

रविवार 30 नोव्हेंबर 2025 ला राजची पूर्वाश्रमीची पत्नी श्यामली डे हिनं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एक स्टोरी शेअर केली. 'Desperate people do desperate things', असं तिनं या पोस्टमध्ये लिहिलं. आतुर लोकं अशीच आतुरतेची कामं करतात... असा काहीसा खोचल टोला तिनं लगावला, ज्यामध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख नव्हता. पण, तरीही सोशल मीडियावर व्हायच्या त्या चर्चा झाल्याच. समांथा आणि राजच्या लग्नाच्या चर्चांदरम्यानची ही पोस्ट त्यांच्यासाठी, किंवा फक्त राजसाठीच तिनं केली आहे असा कयास अनेक सिनेप्रेमींनी लावला. 

Amid wedding rumours Samantha Ruth Prabhu and Raj Nidimorus wedding ex wife post saying desperate people

समांथा कुठे लग्न करतेय? 

अनेक चर्चांनुसार समांथा आणि राज निदीमोरू 1 डिसेंबर 2025 ला कोईंबतूरच्या ईशा सेंटरमध्ये लग्न करत आहेत. चर्चा कितीही रंगल्या तरीही या दोघांपैकी कोणा एकानंही लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं नाही. त्यामुळं आता समांथा खरंच लग्न करते का आणि केल्यास ती याची अधिकृत घोषणा कधी करते याकडेच चाहत्यांचं लक्ष केलं आहे. 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More