close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अमिताभ बच्चनकडून विवेकच्या त्या वादग्रस्त ट्विटला उत्तर

बिग बिंनी त्याला अतिशय साध्या शब्दात सल्ला दिला आहे.

Updated: May 21, 2019, 11:29 PM IST
अमिताभ बच्चनकडून विवेकच्या त्या वादग्रस्त ट्विटला उत्तर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत झळकणारा विवेक ओबेरॉय ट्विटरवर केलेल्या पोस्टमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. त्याच्या या ट्विटचे फारच गंभीर पडसाद उमटले आहेत. त्याच्या या कृतीनंतर राष्ट्रीय महिला आयोगाने त्याला नोटीसही पाठवली होती. त्यानंतर त्याने झालेल्या प्रकरणाची माफी मागत ते ट्विट डिलिटही केले. आता खुद्द जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून विवेकला सावधानगी बाळगण्यास सांगितले आहे. 

बिग बिंनी त्याला अतिशय साध्या शब्दात सल्ला दिला आहे. ट्विटरवर पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले की, 'सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट शेअर करण्याआधी त्या गोष्टीचा शांत डोक्याने विचार करणे फार गरजेचे आहे.'

मीममध्ये अभिनेता सलमान खान, विवेक ओबेरॉय आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन दिसत आहे. एक्झिट पोलच्याच पार्श्वभूमीवर या त्रिकुटांचे मीम सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. 

विवेकने शेअर केलेल्या मीममध्ये सलमान आणि ऐश्वर्याचा फोटो असणाऱ्या भागावर 'ओपिनियन पोल' असे लिहिले होते. अभिषेक बच्चनसोबतच्या तिच्या फोटोवर 'रिझल्ट्स' असे लिहिण्यात आले होते.