वास्तुशास्त्रामुळे हिट झाला शाहरुख खानचा 'जवान' आणि 'पठाण'; आनंद पंडित म्हणाले - त्याच्या घरातील एनर्जीवर काम केलं आणि...

Anand Pandit on Shah Rukh Khan's Movie Success : आनंद पंडीत यांनी नुकत्याच एका मुलाखतीत वास्तु शास्त्रामुळे शाहरुखचे चित्रपट हिट झाल्याचे सांगितले. 

दिक्षा पाटील | Updated: May 18, 2025, 02:58 PM IST
वास्तुशास्त्रामुळे हिट झाला शाहरुख खानचा 'जवान' आणि 'पठाण'; आनंद पंडित म्हणाले - त्याच्या घरातील एनर्जीवर काम केलं आणि...
(Photo Credit : Social Media)

Anand Pandit on Shah Rukh Khan's Movie Success : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा इंडस्ट्रीतील बड्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. त्याला देखील त्याच्या वाईट काळातून जावं लागलंय. एकवेळ होती जेव्हा एकामागे एक त्याचे चित्रपट 'जब हैरी मेट सेजल' जीरो बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप झाले. त्यानंतर शाहरुख खाननं त्याच्या करिअरमध्ये ब्रेक घेतला. त्यात कोरोना काळ सुरु झाला आणि हा ब्रेक मोठा झाला. त्यानंतर त्याचे दोन चित्रपट पठाण आणि जवान दोन्ही हिट आहे. त्या दोघांनी 2000 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. आता निर्माता आनंद पंडित यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आणि त्यांनी सांगितलं की हे चित्रपट इतके हिट होण्या मागचं कारण वास्तु आहे.

शाहरुख खाननं आनंद पंडित यांच्याविषयी सांगितलं होतं की 'ते माझे आध्यात्मिक गुरु आहेत. ते वास्तुला समजतात. त्यामुळे जेव्हा माझा कोणताही चित्रपट चांगली कमाई करत नाही, तर मी त्यांना घरी बोलावतो आणि गोष्टींना बदलायला सांगतो. मी म्हणतो सर, माझा आधीचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही, काही तरी करा. त्यानंतर ते आरसा इथे तिथे ठेवण्याचा सल्ला देतात. पण चांगली गोष्ट ही आहे की माझे चित्रपट चालत आहेत.'

दरम्यान, शाहरुखच्या कमेंटवर रिअ‍ॅक्ट करत आनंद पंडित यांनी स्क्रीनला सांगितलं की 'जेव्हा आम्ही जवळ आहो, तेव्हा मी त्याला मार्गदर्शन करणं सुरु केलं होतं की एक खास वास्तू शास्त्र आहे जे एनर्जीवर आधारीत आहे. ज्याचा मी अभ्यास करतो. आम्ही त्याची घरी जी एनर्जी आवश्यक आहे ती बनवली आणि ते त्याच्यासाठी काम करून गेलं. तो इतका विनम्र आणि महान आहे की त्यानं ते मान्य देखील केलं आणि मी त्यासाठी आभारी आहे. जेव्हा विचारण्यात आलं की शाहरुखनं त्याला कोणत्या चित्रपटांसाठी संपर्क केला, तेव्हा आनंद पंडितनं सांगितलं पठाण आणि जवान दोघांसाठी केलं होतं.'

हेही वाचा : 'मी नक्कीच लग्न करेन, सध्या पार्टनर...'; रश्मिका मंदानाचं नाव घेताच अशी होती विजय देवरकोंडाची Reaction

2023 मध्ये शाहरुख खाननं राजकुमार हिरानी यांच्या 'डंकी' या चित्रपटात देखील काम केलं होतं. या चित्रपटाला देखील चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. या चित्रपटानं 470 कोटींची कमाई केली. शाहरुख खान आता त्याचा अ‍ॅक्शनपट 'किंग' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत त्याची लेक सुहाना खान देखील आहे. चित्रपटात अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, दीपिका पुदकोण, जॅकी श्रॉफ, अर्शद वारसी आणि अनेक कलाकार आहेत.