गुडन्यूजबद्दल विचारलं असता अंकिता वालावलकरचं उत्तर; फॅमिली प्लॅनिंगवर खुलासा…

Ankita Walawalkar on Pregnancy : अंकिता वालावलकर गुडन्यूजबद्दलच्या चर्चेत आहे. चाहत्यांच्या उत्सुकतेदरम्यान तिने अलीकडच्या मुलाखतीत फॅमिली प्लॅनिंगवर भाष्य केलं.  

कावेरी पिंपळे | Updated: Nov 14, 2025, 06:50 PM IST
गुडन्यूजबद्दल विचारलं असता अंकिता वालावलकरचं उत्तर; फॅमिली प्लॅनिंगवर खुलासा…

कोकणाची लाडकी अभिनेत्री आणि ‘बिग बॉस मराठी ५’ची चर्चेत राहिलेली स्पर्धक अंकिता वालावलकर आणि लोकप्रिय गायक–संगीत दिग्दर्शक कुणाल भगत यांनी 16 फेब्रुवारी 2025 रोजी सिंधुदुर्गच्या वालावल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात विवाहबंधनात अडकत चाहत्यांची उत्सुकता वाढवली. शोमध्ये असतानाच अंकिताने आपल्या नात्याबद्दल घरात खुलासा केला होता. त्यानंतर घराबाहेर आल्यानंतर तिने कुणालसोबतचा फोटो शेअर करत नात्याची अधिकृत घोषणा केली आणि चाहत्यांना सुखद धक्का दिला.

Add Zee News as a Preferred Source

लग्नानंतर आता सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये एका गोष्टीबद्दल मोठी चर्चा रंगतेय अंकिता गुडन्यूज कधी देणार? चाहत्यांसह तिच्या घरच्यांकडूनही तिला हा प्रश्न वारंवार विचारला जातो. महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या एका खास मुलाखतीत अंकिता आणि कुणाल यांनी या विषयावर पहिल्यांदाच स्पष्ट आणि प्रामाणिक प्रतिक्रिया दिली. मुलाखतीदरम्यान कुणालला विचारण्यात आलं की, त्याच्या आयुष्यात संगीत, फिरणं आणि आता अंकिता हे तीन महत्त्वाचे घटक आहेत. तर मग चौथं काही लवकरच अॅड होणार का? कुणाल हसत म्हणाला 'चौथ्यासाठी सगळेच प्रेशर टाकत आहेत. पण आम्हा दोघांचे काही प्लॅन आहेत, काही गणितं आहेत. त्यानुसार योग्य वेळ आली तरच निर्णय घेऊ.'

अंकितानेही फॅमिली प्लॅनिंगबाबत आपली बाजू स्पष्ट केली. ती म्हणाली 'मला माझ्या घरुन, विशेषतः आईकडून, खूप टोमणे मिळतात. ‘मुलं वाढवायला एवढे पैसे लागतात का?’, ‘काय इतका करिअरचा विचार करतेस?’असं सतत विचारलं जातं. पण मला प्रामाणिकपणे सांगायचं तर, सध्या हे सर्व आपण योग्यरित्या करू शकू ना, याचं थोडं भय आहे.' कुणाल पुढे म्हणाला 'आमच्यासाठी सध्या चौथ्या व्यक्तीपेक्षा आमचं करिअर, आमचं नातं आणि कुटुंब महत्त्वाचं आहे. म्युझिक माझं पहिलं प्रेम आहे, पण आता अंकिता त्याहूनही महत्त्वाची झाली आहे. ती थोडी रागावली तरी माझं कामच होत नाही.'

अंकिता आणि कुणाल दोघांचेही सोशल मीडियावर मोठं फॅनबेस आहे. दोघांचे व्लॉग, रील्स आणि एकत्र केलेले फोटो चाहत्यांच्या पसंतीस नेहमीच उतरतात. त्यांच्या प्रत्येक अपडेटवर चाहत्यांची नजर असते. दोघांनीही फॅमिली प्लॅनिंगबाबत उघड केलेल्या प्रामाणिक आणि पारदर्शक भूमिकेमुळे त्यांचा हा मुलाखत क्लिप व्हायरल होत आहे. आता चाहत्यांचं लक्ष या जोडीच्या पुढील प्लॅन्सकडे लागलं आहे.

FAQ
अंकिता वालावलकर गुडन्यूजबद्दल काय म्हणाली आहे?
अंकिताने स्पष्ट सांगितले की सध्या ती गुडन्यूज देण्याच्या घाईत नाही. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण केल्यानंतरच ती पुढील निर्णय घेईल.

चाहत्यांना तिच्याकडून गुडन्यूजची एवढी उत्सुकता का आहे?
अंकिता सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स चाहत्यांना सतत जाणून घ्यायचे असतात, त्यामुळे गुडन्यूजबद्दलही अनेक अंदाज सुरू असतात.

अंकिताने फॅमिली प्लॅनिंगबाबत मुलाखतीत नेमकं काय सांगितलं?
तिने सांगितले की फॅमिली प्लॅनिंग हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे. योग्य वेळ, मानसिक तयारी आणि करिअरची संतुलित स्थिती ही सर्व गोष्टी महत्त्वाच्या असल्याचं ती मानते.

About the Author

kaveri pimpley

कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे. ...Read More