)
Annu Kapoor: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर हे त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे आणि खास व्यक्तिमत्त्वामुळे ओळखले जातात. मात्र, त्यांच्या व्यावसायिक आयुष्याइतकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही चर्चेचा विषय राहिले आहे. कित्येक वेळी मुलाखतीतून तर कधी सोशय मीडियावरून ते त्यांच्या भावना मोकळ्यापणे सांगत असतात. अलीकडेच त्यांनी एक मोठं विधान केलं आहे.
अन्नू कपूर हे चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि टीव्ही सुत्रसंचालक आहेत. अन्नू कपूर यांनी अनेक चित्रपट आणि कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. त्यांच्या दमदार अभिनयाने आणि आवाजाने लाखो लोकांच्या मनावर राज्य केलंय.
असरानींच्या निधनाचं दु:ख
20 ऑक्टोबर 2025 ला हास्यकलाकार आणि उत्कृष्ट अभिनेते असरानींनी या जगाचा निरोप घेतला. त्यांची शेवटची इच्छा होती की त्यांच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी जमू नये. अशात ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते असरानी यांच्या निधनाबद्धल अन्नू कपूर यांनी दु:ख व्यक्त केले. पण त्यासोबच त्यांनी स्वत:ची शेवटची इच्छादेखील सांगितली आहे.
मृत्युपूर्वी काही दिवसांपासून असरानी आजारी होते. त्यांच्या फुफ्फुसात पाणी साचल्याने वयाच्या 84 व्या वर्षी त्यांच निधन झालं. असरानींच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी फक्त कुटुंबीय उपस्थित होते आणि त्यांच्या सर्व विधी पार पाडल्यानंतर मीडिया आणि चाहत्यांना कळवण्यात आले.
मी दिवळीत मेलो तर...
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर म्हणाले ती की "मला कोणावरही ओझे व्हायचे नाही. असरानींच्या अंतीम इच्छेने मला नवी प्रेरणा दिली आहे. जेव्हा माझी या जग नावाच्या हॉटेलमधुन निरोप घेण्याची वेळ येईल आणि नेमकी ती वेळ किंवा दिवस राष्ट्रीय सुट्टी जसे स्वतंत्र्यदिन, प्रजासत्ताका दिन किंव इतर कोणता सण... दिवाळी, होळी, ईद, अशावेळी माझे अंतिम संस्कार अगदी गुप्तपणे केले पाहिजे. मला कोणाला त्रास द्यायचा नाही."