Anupam Kher यांनी श्रीदेवीची बहीण बनून अख्या मीडियाला गंडवलं होतं, फोटो पाहुन तुम्हीही चक्रावून जाल

Anupam Kher April Fool Post : अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या फोटोवर कमेंट करत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अनुपम यांनी हा फोटो का शेअर केला आणि त्यामागचं खरं कारण काय हे देखील त्यांनी सांगितले आहे.

Updated: Apr 2, 2023, 12:54 PM IST
Anupam Kher यांनी श्रीदेवीची बहीण बनून अख्या मीडियाला गंडवलं होतं, फोटो पाहुन तुम्हीही चक्रावून जाल title=

Anupam Kher April Fool Post : बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) हे त्यांच्या मजेशीर वक्तव्यांसाठी ओळखले जातात. अनुपम हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अनुपम हे चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत अनुपम यांनी त्यांची एक आठवण शेअर करत एप्रिल फूलचा एक किस्सा सांगितला आहे. 

अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत एक मुलगी दिसत आहे. मात्र, ही कोणतीही मुलगी नसून अनुपम खेर हे स्वत: आहेत. यावेळी अनुपम हे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीच्या लूकमध्ये दिसत आहेत. त्यांचा हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांना धक्काबसला आहे. अनुपम खेर यांनी हा फोटो शेअर करत ‘सिनेब्लीटझ्’ या मासिकासाठी 1991 साली एप्रिल रोजी एप्रिल फूलसाठी हा खास लूक शूट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (Anupam Kher April Fool)

अनुपम फेम यांचा फोटो पाहिलात का?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

1991 मधील त्यांच्या आठवणी शेअर करत अनुपम खेर यांनी कॅप्शन दिले की सिनेब्लीटझ् या मॅग्झिनच्या कव्हर फोटो शूटसाठी मी गे शूट केलं होते. हे आम्ही 1 एप्रिल 1991मध्ये एप्रिल फूल करण्यासाठी शूट केलं होतं. या फोटोमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती, त्याचीच चर्चा होती. मिकी कॉन्ट्रॅक्टरनं मेक केला होता आणि गौतम राजाध्यक्षनं फोटोग्राफी केली होती. ते चित्रपटविश्वातील खूप छान आणि निरागस दिवस होते. दरम्यान, अनुपम खेर यांचा हा फोटो सोशल मीडियावर आजही चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

हेही वाचा : VIRAL VIDEO : आई काजोलसोबत Nysa चं पापाराझींसमोर धक्कादायक कृत्य हात झटकत...

अनुपम खेर यांच्या या फोटोविषयी बोलायचं झाले तर जेव्हा ही मॅग्झिन समोर आली तेव्हा सगळ्यांना धक्काबसला होता. अनुपम यांचा हा फोटो पाहताच अनेकांनी त्यांची तुलना ही अनुपम खेर यांच्याशी केली होती. तर काही लोकांना अनुपम खेर यांना ओळखलं होतं. अनुपम खेर आणि मॅग्झिननं केलेल्या या प्रॅंकनं सगळ्यांना आश्चर्य झाले होते. पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सगळ्यांना हसू अनावर झालं होतं. त्यानंतर सगळ्यांनी अनुपम यांनी किती ग्रेस फुली हा लूक कॅरी केला याविषयी सांगितले आहे. 

अनुपम यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यांचा ‘उंचाई’ हा चित्रपच प्रदर्शित झाला होता. त्यांचा हा चित्रपट सुपरहिट देखील राहिला होता. अनुपम खेर लवकरच हे त्यांचा आगामी चित्रपट ‘द व्हॅक्सीन वॉर’ या चित्रपटात दिसणार असून त्याच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री हे करत आहेत.  दरम्यान, अनुपम खेर यांनी विवेक अग्निहोत्री यांच्यासोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ नाही तर याआधी त्यांनी ‘द काश्मिर फाइल्स’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.