अनुपमाला सोडून 'या' सुंदर मुलीसोबत अनुजचं 'लिपलॉक', शॉकिंग व्हिडीओ समोर

सगळीकडेच व्हिडीओची चर्चा 

Updated: Nov 27, 2021, 08:29 AM IST
अनुपमाला सोडून 'या' सुंदर मुलीसोबत अनुजचं 'लिपलॉक', शॉकिंग व्हिडीओ समोर

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'अनुपमा' खूप पसंत केली जात आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून हा शो टीआरपीच्या यादीत टॉपवर आहे. या शोमध्ये नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. जे प्रेक्षकांना खूप आवडतात. दरम्यान, अनुज कपाडिया म्हणजेच गौरव खन्ना यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

व्हिडिओमध्ये गौरव खन्ना एका मुलीसोबत रोमँटिक करताना दिसत आहे. ही मुलगी दुसरी कोणी नसून त्याची पत्नी आकांशा चमोला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. गौरव खन्ना खुर्चीवर बसून शूज घालून बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akanksha Chamola (@akankshagkhanna)

तेव्हा पत्नी आकांक्षा त्याच्यासाठी पाण्याची बाटली घेऊन येते. गौरव खन्ना पाण्याची बाटली घेण्यासाठी हात वर करताच आकांक्षा बाटली सोडते आणि त्याचा हात पकडते. त्यानंतर गौरव पत्नी आकांक्षाचे ओठावर चुंबन घेतो. या जोडप्याची ही रोमँटिक शैली चाहत्यांना खूप आवडते.

नुकतेच गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांच्या नात्याला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने आकांक्षाने पती गौरवसोबतचा हा रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यावर चाहते त्यांच्या प्रेमाची उधळण करत आहेत. आकांक्षा चमोला अनेकदा पती गौरवसोबत तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते, ज्यांना खूप पसंत केले जाते.

फिल्म लव्हस्टोरी 

विशेष म्हणजे आकांशा चमोला आणि गौरव खन्ना यांची प्रेमकहाणी चित्रपटापेक्षा कमी नाही. दोघांची पहिली भेट एका ऑडिटोरियममध्ये झाली. त्यावेळी गौरव खन्ना टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता झाला होता, पण आकांशा चमोला इंडस्ट्रीत नवीन होती. त्यावेळी आकांक्षा गौरव खन्ना ओळखू शकली नाही. याचा खुलासा खुद्द गौरवने एका मुलाखतीदरम्यान केला आहे.