Anurag Kashyap Talk about His Daughter Aliyah : बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याची मुलगी आलिया कश्यप (Aliyah Kashyap) ही चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. तरी देखील आलिया ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आलिया ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. अनुराग कुठेही गेला तरी त्याला आलियाविषयी विचारण्यात येते. नुकतंच अनुरागनं एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात अनुराग 'ऑलमोस्ट प्यार विद डीजे मोहब्बत' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. यावेळी अनुरागनं त्याच्या लेकीविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुराग कश्यपनं आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, एकदा त्याची मुलगी आलियानं त्याला तिच्या संघर्षाबद्दल सांगितले आणि ती तिच्या वडिलांपेक्षा कशी वेगळी आहे हे सांगितले. याविषयी सांगताना  अनुराग म्हणाला, "आम्हाला वाटतं की आमच्या मुलांना आमचा संघर्ष आणि त्यांना जे काही दिलंय त्याची किंमत कळत नाही. पण त्यांचा संघर्ष वेगळा आहे. आमच्या संघर्षासारखा नसला तरी ते देखील संघर्ष करतात."



याविषयी सांगताना अनुराग म्हणाला, आई-वडील हे त्यांच्या मुलांना समजून घेत नाहीत. त्यांची फक्त एकच इच्छा असते की त्यांच्या मुलांनी सुरक्षा आहे अशा ठिकाणी रहावे. पण सुरक्षा म्हटलं की त्याची व्याख्या ही आई-वडिलांनी दिलेल्या सगळ्या अटींमध्ये असते. माझी मुलगी मला म्हणाली की तू मला समजून घेत नाही, त्यासोबत मला आई देखील समजून घेत नाही. ती म्हणाली की प्रत्येक व्यक्ती येईन माझ्या संघर्षाची कथा सांगतो, मी फक्त 500 रुपये घेऊन इथे कसा आलो होतो. 


आलियानं वडील अनुराग कश्यपला सांगितले की ती कसे पैसे कमवते हे विचारू नका. अनुराग म्हणाला की त्याची लेक आलियानं त्याला सांगितलं की, "मी जसं पण कमावेल, कमवते तर आहे ना? घराचं भाडं स्वत: देते. तुम्हाला काय तक्रार आहे." हे सांगत असताना अनुराग म्हणाला की "आलिया वेगळी राहते आणि ती घर भाडे स्वत: देते." आलिया ही एक युट्यूबर आहे. ती लाइफस्टाईल संबंधीत व्हिडीओ बनवते. 


हेही वाचा : 'मला बाहेरच्या सोफ्यावर झोपवून...', Nawazuddin Siddiqui च्या पत्नीनं खासगी व्हिडीओ शेअर करत केले आरोप


अनुराग त्याच्या मुलीनं सांगितलेल्या तिच्या संघर्षाविषयी बोलताना म्हणाला, "मला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही. तुझ्या आई-वडिलांनी तुझ्या शिक्षणावर जास्त खर्च केला ही तुझी चूक आहे. पण तुला चित्रपट निर्माता होत  काहीतरी सिद्ध करायचे होते. मला देण्यासाठी तुझ्या डोक्यावर कर्जाचं ओझ नव्हतं. तुझ्याकडे माझ्या शिक्षणासाठी खर्च करण्यासाठी पैसे होते. माझा संघर्ष स्वत: शी आहे आणि स्वत: शी संघर्ष करणं खूप कठीण आहे.