अनुष्का शर्मा - विराट कोहलीचा रोमँटिक बॉन्ड, 'या' आहेत खास गोष्टी

अशी आहे अनुष्का-विराटची लव्हस्टोरी 

Updated: May 1, 2021, 11:28 AM IST
अनुष्का शर्मा - विराट कोहलीचा रोमँटिक बॉन्ड, 'या' आहेत खास गोष्टी

मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. दोघंही परफेक्ट कपल म्हणून ओळखले जातात. या दोघांचे देश-परदेशात असंख्य चाहते आहेत. विराट आणि अनुष्का यांच्या लग्नाला तीन वर्षे झाले आहेत. आताही या दोघांची लव्हस्टोरी खूप प्रेरणादायी आणि सुंदर आहे. कशी झाली या दोघांची पहिली भेट. 

विराट कोहली जेव्हा पहिल्यांदा अनुष्काला भेटला तेव्हा तो खूप नर्व्हस होता. याची कबुली त्याने स्वतः दिली आहे. विराटने अमेरिकेतील टीव्ही स्पोर्टस रिपोर्टर ग्राहम बेनसिंगर याच्याशी गप्पा मारताना सांगितलं होतं. मी पहिल्यांदा अनुष्काला भेटलो तेव्हा मी लगेचच जोक मारला. कारण मी त्यावेळी खूप नर्व्हस होतो. त्यामुळे मला कळलं नाही की, मी काय करू? आणि तेव्हा मी जोक मारला. 

विराट - अनुष्काची पहिली ओळख 2013 मध्ये एका जाहिरातीच्या शुटिंग दरम्यान झाली. दोघांनी एका शॅम्पूची जाहिरात केली होती. तेव्हा विराट भारतीय संघात खेळत होता आणि अनुष्काने अनेक सिनेमे केले होते. 

पहिल्या भेटीबद्दल सांगताना विराट म्हणाला की,'जेव्हा सेटवर आमच्या दोघांची भेट झाली आणि दोघं मस्करी करताना एकमेकांच्या जवळ आले. मी असं काही केलं जे करायला नको होतं. माझी उंची अनुष्कापेक्षा कमी आहे. त्याचवेळी तिने हिल्स देखील घातली होती. आमच्या दोघांची उंची थोडी कमी जास्त आहे. तेव्हा मी अनुष्काला स्पष्ट बोलतो की, तुझी हिल्स जास्त आहे. तेव्हा अनुष्काने लगेच उत्तर दिलं एक्सक्युझ मी, आणि त्यानंतर मी तिची मस्करी करत होते.'

2017 मध्ये लग्न करेपर्यंत या दोघांनी एकमेकांना डेट केलं आहे. अनेकदा दोघं एकमेकांसोबत दिसले आहे. 2014 साली जेव्हा टीम इंडिया साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावरून मुंबईत परतली. तेव्हा विराट सरळ अनुष्काच्या घरी गेला होता. तसेच अनुष्का देखील न्यूझीलंड दोऱ्यावर विराटसोबत होती. आतापर्यंत अशा अनेक सामन्यात हे दोघं एकत्र दिसले. 

विराट-अनुश्का करोडो संपत्तीचे मालक आहेत. पण या दोघांचा जन्म मिडिल क्लासमध्ये झाला आहे. यावर विराट म्हणतो, 'आम्ही दोघं मिडल क्लास कुटुंबातून आलो आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करत आहोत. प्रचंड मेहनत करून एक प्लॅटफॉर्म मिळाला. आणि आमची प्रगती झाली.'

विराट आणि अनुष्काने आपल्या करिअरची सुरूवात 2008 मध्ये केली आहे. या दोघांनी एकत्रच आपल्या करिअरमध्ये यश गाठलं आहे. या दोघांची पहिली डेट ही अतिशय ट्रेडिशनल होती. 11 डिसेंबर 2017 रोजी विराट-अनुष्काचं लग्न झालं. इटलीमध्ये टस्कनी शहरात यांनी डेस्टिनेशन वेडिंग केलं आहे. जानेवारी 2021 मध्ये अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आणि वामिका असं तिचं नाव ठेवलं आहे.