Actress : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिच्या मोहक व्यक्तिमत्त्वाने आणि अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. तिचं नाव घेताच चाहत्यांना तिच्या चित्रपटांची आठवण येते आणि ती पडद्यावर झळकली की प्रत्येक नजर तिच्यावरच थांबते. साधेपणातली सुंदरता, डोळ्यांतील जादू आणि तिच्या अदांतील नजाकत पाहून चंद्रही लाजेल असं म्हणतात.
44 वर्षीय अनुष्का शेट्टी आज भारतीय चित्रपटातील काही मोजक्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचं नाव म्हणजे यशाची हमी मानली जाते. हिंदी प्रेक्षकांसाठी ती सर्वाधिक ओळखली जाते. ‘बाहुबली’ चित्रपटातील ‘देवसेना’ची भूमिकामुळे ती खूप लोकप्रिय झाली. दक्षिणेच्या चित्रपटसृष्टीत ती गेल्या दोन दशकांपासून स्वतःचं साम्राज्य निर्माण करून बसली आहे.
अनुष्का शेट्टीचा जन्म 7 नोव्हेंबर 1981 रोजी कर्नाटकातील मंगळुरू येथे झाला. तिचं खरं नाव स्वीटी शेट्टी आहे. तिच्या घरच्यांचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नव्हता. ती शिक्षणात उत्तम आणि लहानपणापासूनच आत्मविश्वासू होती. अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी ती योगा शिक्षक म्हणून काम करत होती. तिच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन एका दिग्दर्शकाने तिला चित्रपटात काम करण्याची संधी दिली आणि तिथून तिच्या चित्रपटाच्या प्रवासाची सुरुवात झाली.
अनुष्काने 2005 साली तेलुगू चित्रपट ‘सुपर’ मधून पदार्पण केलं. या चित्रपटात तिने दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनसोबत काम केलं. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मध्यम यश मिळालं पण अनुष्काच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर 2008 मध्ये आलेल्या ‘शौर्यम’ मध्ये तिने अभिनेता गोपीचंदसोबत काम केलं. त्यांच्या जोडीचं आणि अनुष्काच्या सशक्त अभिनयाचं कौतुक झालं.
2009 साली आलेल्या ‘अरुंधती’ या चित्रपटाने अनुष्काच्या कारकिर्दीला नवा दिशा दिली. या चित्रपटात तिच्या अभिनयाची जादू अशी पसरली की ती दक्षिणेची लेडी सुपरस्टार म्हणून ओळखली जाऊ लागली.
यानंतर तिने 2010 मध्ये अल्लू अर्जुनसोबत ‘वेदम’ मध्ये काम केलं. ज्यात तिने एका वेश्येची भावनिक भूमिका साकारली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कामगिरी केली असली तरी अनुष्काच्या अभिनयाची प्रशंसा सर्वत्र झाली.
अनुष्काची ओळख केवळ एक सुंदर अभिनेत्री म्हणून नाही तर एका स्वतंत्र आणि बळकट स्त्रीच्या प्रतीक म्हणून झाली आहे. ती प्रत्येक भूमिकेत स्वतःला हरवून देत प्रेक्षकांना भावनिक प्रवास घडवते.
FAQ
1. अनुष्का शेट्टीचा जन्म कधी आणि कुठे झाला?
अनुष्का शेट्टीचा जन्म 7 नोव्हेंबर 1981 रोजी कर्नाटकातील मंगळुरू येथे झाला. तिचं खरं नाव स्वीटी शेट्टी आहे.
2. अनुष्का शेट्टीने अभिनय क्षेत्रात कसं पदार्पण केलं?
अनुष्का सुरुवातीला योगा शिक्षक म्हणून काम करत होती. तिच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन एका दिग्दर्शकाने तिला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. तिने 2005 साली तेलुगू चित्रपट ‘सुपर’ मधून अभिनयात पदार्पण केलं.
3. अनुष्का शेट्टीच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट कोणता चित्रपट ठरला?
2009 साली आलेला ‘अरुंधती’ हा चित्रपट अनुष्काच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटानंतर ती दक्षिणेची “लेडी सुपरस्टार” म्हणून ओळखली जाऊ लागली.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.