कौन बनेगा करोडपतीमध्ये जाण्यासाठी या महिलेने केले ५०० हून अधिक एसएमएस
बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन आणि कौन बनेगा करोडपती (KBC)या समीकरणाने टेलिव्हिजनवर खूप लोकप्रियता मिळवली.
मुंबई : बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन आणि कौन बनेगा करोडपती (KBC)या समीकरणाने टेलिव्हिजनवर खूप लोकप्रियता मिळवली.
केवळ मोठ्या पदड्यावर राज्य करणारा अभिनेता KBC च्या माध्यमातून टेलिव्हिजनद्वारा घराघरात पोहचला.
सध्या KBCचे नववे पर्व सुरू झाले आहे. या पर्वासाठीही प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन केले. KBC 9 या पर्वामध्ये सहभागी होता यावे याकरिताहरियाणाच्या अर्चना व्यास यांनी तब्बल५०० हूनअधिक एसएमएस केले.
कसा होता KBC 9 मधील प्रवास ?
अर्चना यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. त्यांना KBCच्या टीमकडून फोन आला. यामध्ये १० सेकंदाच्या वेळेत प्रत्येकी ३ प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. हा राऊंडही अर्चना यांनी पार करून पुढील फेरीत प्रवेश मिळवला.
भोपाळ मध्ये अर्चना यांना २ फेर्या पार करणं गरजेचे होते. त्यापैकी पहिल्या फेरीत १० प्रश्नांची उत्तरं आणि दुसर्या फेरीत एक व्हिडीओ इंटरव्ह्यू होता. या दोन्ही फेर्या पार करून अर्चना मुंबईत पोहचल्या.
हरियाणातील रेवडी शहर ते स्वप्नांचं शहर मुंबई असा प्रवास केलेल्या अर्चना KBC 9च्या तिसर्या एपिसोडमध्ये बिग बींसमोर हॉट सीटवर बसल्या. या खेळात अर्चना सव्वा तीन लाख रूपये जिंकल्या आहेत. नुकत्याच सुरू झालेल्या KBC 9 या पर्वात अजूनही कोणत्याच स्पर्धक मोठी रक्कम जिंकू शकला नाही.