मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आपल्या व्यावसायिक जीवनापेक्षा वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत आहे. अर्जुन मलायका अरोरासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही बर्‍याचदा एकत्र पार्टी करताना दिसतात. दोघांचे लग्न केव्हा होईल? या प्रतीक्षेत त्यांचे फॅन्स आहेत. अशा परिस्थितीत आज अर्जुनने मंगळसूत्र हातात घेतलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर चाहत्यांना असे वाटते की, अर्जुनने मलायकासाठी हे मंगळसूत्र विकत घेतले आहे. परंतु त्यामागची कहाणी ही काही वेगळीच आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुन आणि मलायका लग्न करणार नाहीत. तर या फोटो अर्जुनने 'की ऍन्ड का'  या चित्रपटाला 5 वर्ष पूर्ण झाल्यामुळे शेअर केला आहे. फोटो शेअर करताना अर्जुनने लिहिले- "फिल्म 'की ऍन्ड का'चा एक अविस्मरणीय तुकडा. सेटला आणि ऑन-स्क्रीन 'की' ला मी मिस करत आहे. हा चित्रपट वैयक्तिक होता आणि मी तो माझ्या आईसाठी निवडला होता. 



बाल्की सर आणि बेबोसोबत काम करून, हा चित्रपट अधिक वैयक्तिक झाला आहे. मला वाटते की, आपण याचा सिक्वेल बनविला पाहिजे काय वाटंय करिना कपूर?"


अर्जुन कपूरचा हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला आहे. एका चाहत्याने कमेन्ट दिली - "ग्रेट फिल्म. ही फिल्म केल्याबद्दल धन्यवाद अर्जुन." त्याच वेळी दुसऱ्या चाहत्याने लिहिले -"अंडररेटेड फिल्म. मला माझ्या आईसारखे व्हायचे आहे."


'की ऍन्ड का' दिग्दर्शन आर बाल्की यांनी केला आहे. यात अर्जुन आणि करिनाने एक विवाहित जोडपे म्हणून काम केले आहे. या चित्रपटातील कथा ही भारतीय सोसायटीने बनवलेले नियम मोडत आहे. चित्रपटात अर्जुन म्हणजेच 'की' चा नवरा घराची देखभाल करतो आणि 'की' ऑफिसला जाते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला.


यामुळे, चित्रपटाला हो म्हणालो


अर्जुन कपूर म्हणाला की, 'की ऍन्ड का' चित्रपट त्याच्यासाठी खूप महत्वाचा आहे. स्क्रिप्टची एक ओळ ऐकताच त्याने यास होकार दिला होता. ती ओळ अशी होती की, 'मला माझ्या आईसारखे व्हायचे आहे.'