Rupali Ganguly Compare with Jaya Bachcahn : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुपाली गांगुली ही अनुपमा या मालिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेतून तिनं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या रुपाली गांगुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात रुपाली ही एका व्यक्तीला ओरडताना दिसत आहे. खरंतर ती ओरडून काही समजवताना दिसत आहे. पण व्हिडीओ शेअर करत पापाराझी आणि काही सोशल मीडिया हॅन्डल दावा करत आहेत की रुपाली गांगुलीला कोणत्या तरी गोष्टीवर राग आला होता. इतकंच नाही तर त्यानंतर रुपाली ही व्हिडीओ बनवणाऱ्याला ओरडताना दिसली.
हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टंट बॉलिवूडनं शेअर केला आहे. या व्हिडीओला पाहाताच त्यावर नेटकरी विविध कमेंट करतान दिसत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'अनुपमामध्ये अॅटिट्यूड आला आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'जया बच्चनसारखं करते.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'तिला सगळ्यात उशिरा आमंत्रण दिसलं असेल.' त्याविषयीच बोलते. आणखी एक नेटकरी म्हणाला, 'यशस्वी काय झाली सगळं काही विसरली बाकी काही नाही.'
एकीकडे काही नेटकरी हे रुपालीला ट्रोल करत असले तरी काही नेटकरी हे तिला पाठिंबा देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'अरे यार ठीक आहे. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की तिनं काही बोलायचं नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'अरे ती म्हणते की मला आता आमंत्रण मिळालं, आपल्या मित्रांवर थोडं चिडते.' तर तिसरा नेटकरी म्हणाला, 'व्हिडीओ पूर्ण पाहा अर्धवट नाही. ती म्हणते की तुचं आमंत्रण दिलं आहेस आणि ज्याच्याशी बोलते तो तिचा मित्र आहे. तर त्यांची मस्करी सुरु आहे. त्यामुळेच म्हणतात पूर्ण सत्य माहित असणं गरजेचं आहे.'
हेही वाचा : 'या' अभिनेत्यानं 4 वेळा केलं लग्न; लेकीपेक्षा 4 वर्ष लहान आहे बायको
अनुपमा मालिकेत रुपाली गांगुली महत्त्वाच्या भूमिकेत आहे. अनुपमा या भूमिकेत प्रेक्षकांच्या ती पसंतीस उतरली आहे. आता मालिकेत राहीचं लग्न झालं आहे आणि अनुपमाला तुरुंगात जेवणं सप्लाय करण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. दरम्यान, तुरुंगात अनुपमाची भेट ही राघव नावाच्या एका व्यक्तीशी होते ज्याला अनुजच्या मृत्यूचं सत्य माहित असतं.